बापरे! सुंदर दिसण्याच्या नादात तरुणीने घेतलं इंजेक्शन; भलत्याच जागी झाला विपरित परिणाम अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 06:18 PM2022-02-04T18:18:24+5:302022-02-04T18:30:27+5:30

Kayla Jenkins : एका तरुणीने आपली कॉस्मेटिक सर्जरी करून घेतली. ज्यासाठी इंजेक्शन घेतलं त्याचा परिणाम मात्र भलत्याच ठिकाणी झाला.

filler blind women deformed her face lip by injections now dissolved this after 7 year | बापरे! सुंदर दिसण्याच्या नादात तरुणीने घेतलं इंजेक्शन; भलत्याच जागी झाला विपरित परिणाम अन्...

फोटो - सोशल मीडिया

googlenewsNext

आपण सुंदर दिसावं यासाठी काही जण वाटेल ते करतात. यासाठी मेकअपशिवाय कॉस्मेटिक सर्जरीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. सुंदर दिसण्याच्या नादात केलेला भलताच प्रयोग अनेकदा अंगाशी येतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. छान दिसण्याच्या नादात तरुणीने इंजेक्शन घेतलं पण भलत्याच जागी विपरित परिणाम झाला आहे. एका तरुणीने अशीच आपली कॉस्मेटिक सर्जरी करून घेतली. ज्यासाठी इंजेक्शन घेतलं त्याचा परिणाम मात्र भलत्याच ठिकाणी झाला. जो पाहून तरुणीला मोठा धक्काच बसला. डोरसेटमध्ये (Dorset) राहणारी 27 वर्षीय कायला जेनकिन्स (Kayla Jenkins) जी एक लोकप्रिय टिकटॉक स्टार आहे. 

कायलाने आणखी सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यासोबत काही प्रयोग केले आणि आता त्याचा पश्चाताप होत आहे. तिला आपले ओठ बिलकुल आवडत नव्हते. तिला ओठ थोडे मोठे हवे होते. त्यामुळे तिने लिप सर्जरी करण्याचं ठरवलं. तिने लिप फिलर करून घेतलं. इंजेक्शनमार्फत तिने आपल्या ओठांचा आकार वाढवून घेतला. आपला हा नवा लूक तिला आवडला. आपल्या अशा ट्रिटमेंटसाठी कायला लाखो रुपये खर्च करायची. पण दर महिन्याला तिच्या चेहऱ्यात बदल होत गेला. पण त्यानंतर तिचे फॉलोअर्सही तिला ट्रोल करू लागले. 

आपण त्यांना आवडत नाही म्हणून ते आपलं कौतुक करत नाही, असं समजून कायलाने त्यांना फार गांभीर्याने घेतलं नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र एक दिवस तिने स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा आपला चेहरा खूप बदलल्याचं तिच्या लक्षात आलं. तिचं नाक, गालाजवळ सूज आली होती. त्यानंतर ती लगेच आपल्या कॉस्मेटिक सर्जनकडे गेली. तिथे तिला त्यागील जे कारण समजलं ते ऐकून धक्काच बसला. सर्जनने सांगितल्यानुसार, तिने जे फिलर इंजेक्शन ओठांमध्ये लावलं होतं, त्याचा परिणाम सामान्यपणे 6 महिन्यांनी संपतो. पण कायलाचं फिलर 6 वर्षांपर्यंत तसंच होतं. 

ते हळूहळू तिच्या चेहऱ्यामध्ये पसरलं आणि तिचा चेहरा असा सुचला. ओठ मोठे आणि वजनदार झाल्याने तिचा चेहरा लटकल्यासारखा झाला. लाफिंग लाइन्स बनल्या. चेहरा विकृत दिसू लागला. कायलाला आपला मूळ चेहरा परत हवासा वाटला. तिने कॉस्मेटिक सर्जन्सना बोटॉक्स आणि फिलर्स डिझॉल्व्ह करायला सांगितलं. आता तिचा मूळ चेहरा पुन्हा तिला मिळाला ज्यात ती अधिकच सुंदर दिसते आहे. फिलर्स हटवल्यानंतर कायलाने आपला फिलर्ससह आणि फिलर्सशिवाय असे फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हा चाहत्यांना तिचा ओरिजनल लूक खूप आवडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: filler blind women deformed her face lip by injections now dissolved this after 7 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.