आई ती आईच! लॉकडाऊन दरम्यान 'या' आईने डोनेट केलं स्वत:चं ४२ लीटर ब्रेस्ट मिल्क!
By अमित इंगोले | Published: November 19, 2020 12:42 PM2020-11-19T12:42:29+5:302020-11-19T12:44:24+5:30
व्हॉइस न्यूज चॅनलसोबत बोलताना त्यांनी सांगितले की, 'मुलाच्या जन्मानंतर मला असं जाणवत होतं की, खूप सारं ब्रेस्ट मिल्क वाया जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून ४२ वर्षीय फिल्ममेकर आणि निर्माती निधि परमार हिरानंदानी यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. कारणंही तसंच आहे. त्यांनी लॉकडाऊन दरम्यान तब्बल ४२ लीटर ब्रेस्ट मिल्क डोनेट केलं आहे. यावर्षीच त्या आई झाल्या आहेत. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्याकडे जास्त ब्रेस्ट मिल्क स्टोर्ड आहे. तर त्यांनी फॅमिली आणि नातेवाईकांसोबत चर्चा केली. अनेक सल्ले मिळाले आणि त्यानंर त्यांनी ब्रेस्ट मिल्क डोनेट करण्याचा निर्णय घेतला.
बाळ पित नव्हतं पुरेसं दूध
व्हॉइस न्यूज चॅनलसोबत बोलताना त्यांनी सांगितले की, 'मुलाच्या जन्मानंतर मला असं जाणवत होतं की, खूप सारं ब्रेस्ट मिल्क वाया जात आहे. कारण मुलगा पूर्ण दूध पित नव्हता. त्यावेळी माझ्याकडे १५० एमएलची तीन पॅकेट्स होते. मला या दुधाचा वापर करायचा होता. माझ्या घरातील फ्रीजर ब्रेस्ट मिल्कने भरलेलं होतं. मी इंटरनेटवर वाचलं होतं की, ब्रेस्ट मिल्क ३ ते ४ महिने फ्रीजरमध्ये ठेवलं जाऊ शकतं'.
नंतर त्यांनी याबाबत इंटरनेटवर माहिती घेणं सुरू केलं. त्यांना माहिती मिळाली की, अमेरिकेत ब्रेस्ट मिल्क डोनेट केलं जातं. त्यामुळे त्यांनी आपल्या आजूबाजूच्या भागात डोनेशन सेंटर्सचा शोध घेतला. यादरम्यान एका गायनोकॉलॉजिस्टने त्यांना मुंबईतील एका हॉस्पिटलबाबत माहिती दिली. इथे ब्रेस्ट मिल्क बॅंक चालवली जात होती.
याचदरम्यान देशात लॉकडाऊन सुरू होता. यावर्षी मे महिन्यापासून निधि यांनी तब्बल ४२ लीटर ब्रेस्ट मिल्क सूर्या हॉस्पिटलच्या नियोनेटल इंटेसिव्ह केअर यूनिटला डोनेट केलं. या हॉस्पिटलमध्ये ६५ अॅक्टिव बेड आहेत. इथे अनेक प्रीमच्योर बाळ भरती आहेत आणि त्यांचं वजनही कमी आहे.
वर्षभर डोनेट करणार दूध
निधि म्हणाल्या की, त्यांनी नुकतीच हॉस्पिटलला भेट दिली आणि काम कसं सुरू आहे हे पाहिलं. तिथे त्यांना ६० असे बाळ दिसले ज्यांना दुधाची गरज होती. त्यानंतर त्या म्हणाल्या की, त्या यावर्षी पूर्ण प्रयत्न करतील की, त्या या बाळांना दूध डोनेट करत राहतील. निधि या 'सांड की आंख' सिनेमाच्या निर्मात्या होत्या.
All Images Source: instagram/nidhiparmarhira