PNB scam: सोशल मीडियावर 'छोटा मोदी’ आणि 'फाईंडिंग निमो' ट्रेंडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 01:25 PM2018-02-17T13:25:43+5:302018-02-17T13:29:32+5:30
नेटिझन्सकडून कमालीची क्रिएटिव्हिटी वापरली जात आहे.
मुंबई: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 11 हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीमुळे सत्ताधारी भाजप चांगलाच अडचणीत आला आहे. या घोटाळ्यानंतर विरोधकांसह सोशल मीडियावर होत असलेल्या खोचक टीकेने भाजपाचे नेते चांगलेच बेजार झाले आहेत. गेल्या चार वर्षांच्या काळात विरोधकांकडून भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले. मात्र, स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करायला विरोधक काहीसे कचरत होते. सोशल मीडियावरही मोदींनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधानपदाभोवती जे वलय निर्माण झाले होते, त्या भीतीने का होईना, नरेंद्र मोदींची थट्टा करायला नेटिझन्स बिचकत असत. मात्र, नीरव मोदीचा घोटाळा बाहेर आल्यापासून विरोधक आणि नेटिझन्स दोघेही कमालीचे आक्रमक झाले आहेत. यापूर्वी बेहिशेबी संपत्तीचे आरोप झाल्यानंतर फरार झालेला ललित मोदी आणि नीरव मोदी यांच्या आडनावाशी असलेल्या नामसार्धम्यामुळे नरेंद्र मोदी कधी नव्हे इतके अडचणीत आले आहेत. मोदी या प्रकरणानंतर गप्प आहेत. त्यामुळे सरकारमधल्याच एखाद्या मंत्र्याचे नीरव मोदीला अभय तर नाही ना? असा प्रश्न विरोधकांसह देशातील जनताही विचारत आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील नीरव मोदी प्रकरणावरून मोदींवर निशाणा साधला होता. ‘मोदींना मिठी मारा आणि १२ हजार कोटी लुटा, हा फरार मोदी दाव्होसमध्ये पंतप्रधानांसोबत दिसला आणि त्यांच्याशी असलेल्या संबधांचा वापर करून तो देशाबाहेर पळाला. ‘ अशी टीका केली त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी या फरार नीरव मोदीचं नामकरण ‘छोटा मोदी’ केलं आहे. या प्रकरणावर मौन बाळगून असलेले पंतप्रधान मोदी आणि फसवणूक केलेल्या नीरव मोदीवर ‘#छोटा_मोदी’ हा हॅशटॅश वापरून ट्विपल्स टीका करत आहेत. तर 'फाईंडिंग नीमो' या अॅनिमेटेड चित्रपटाच्या पोस्टरचे विडंबन करूनही 'मोदी' फॅक्टर अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही सगळी टीका करताना नेटिझन्सकडून कमालीची क्रिएटिव्हिटी वापरली जात आहे. एरवी राजकीय विरोधकांच्या शेलक्या टीकेला तत्त्परतेने प्रत्युत्तर देणाऱ्या भाजपा नेते सोशल मीडियावरील आरोपांपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे.
Chota MODI proved BADA MODI and INDIAN POOR that EASE OF DOING BUSINESS is so Easyyyy #छोटा_मोदीpic.twitter.com/Vjsi9VgXT0
— Sasikumar (@INDIADefeatmodi) February 16, 2018
India's biggest blockbuster.
— Pervez M (@PervezM) February 17, 2018
"Hum Sabh Chor Hai"
Staring : Nirav Modi, Lalit Modi, Vijay Mallya and others.
Directed by:Indian Politicians.
Produced by:All banks in India.
Will bring tears to your eyes n empty your wallets.😢#ChotaModi#ModiRobsIndiapic.twitter.com/R3SYsnQYmW
Modi ji working 25×7 days non-stop for #ChotaModi 😹😹😹 pic.twitter.com/9pIR3ABa19
— Wish 🕊 (@_itswish) February 15, 2018
Guide to Looting India
— Office of RG (@OfficeOfRG) February 15, 2018
by Nirav MODI
1. Hug PM Modi
2. Be seen with him in DAVOS
Use that clout to:
A. Steal 12,000Cr
B. Slip out of the country like Mallya, while the Govt looks the other way.
#From1MODI2another
BJP called #RahulGandhi Pappu - He did nothing.
— Shah Rukh Khan (@TheShahRKhan) February 16, 2018
Karma Hits - Now People are calling someone #छोटा_मोदी#Justsaying#Notbelongstoanypoliticalparty
One quick, cute, innocent question. Was NiravModi's bank account linked to his Aadhar?
— Anubhav Sinha (@anubhavsinha) February 15, 2018
Few probabilities of #छोटा_मोदी
— Manak Gupta (@ManakGupta_) February 16, 2018
1) Some1 wil cry in his next speech
2) Some1 might challenge tht if the public is nt happy with his work thn thy can hang him
3) CBI raid on AAP MLAs
4) Vadra nabbing for 50th time
5) Some1 will stop #TirangaYatra
6) Some Maulana will abuse India
Now Daddy NAMO will Go to world tour To #FindingNimo
— Sasikumar (@INDIADefeatmodi) February 16, 2018
#छोटा_मोदी
This time Vikas has become. #छोटा_मोदी
— Muhammad Armanullah (@aflatoonarman) February 16, 2018
Nirav Modi Virus Spreading Rapidly.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 16, 2018
जय हिंद
ये चारों 'P' ने देश मे भूचाल मचा दिया है ।
प्रिया
पकोड़ा
पदमावत
पंजाब नेशनल बैंक