इथे महिलांची बोटं कापून केलं जातं 'हे' धक्कादायक काम, कारण वाचून हैराण व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 05:50 PM2021-08-11T17:50:29+5:302021-08-11T17:50:56+5:30
इंडोनेशियातील पापुआ गिनी बेटावर राहणारे दामी जमातीतील अनेक महिला कापलेल्या बोटांसह जगताना बघण्यात आल्या आहेत.
जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रितीरिवाज आहेत. जन्म, विवाहापासून ते मृत्यूपर्यंत काही खास रिवाज असतात. पण काही ठिकाणी अशा परंपरा आहेत ज्या फार क्रूर आणि वेदनादायी असतात. अशीच एक परंपरा इंडोनेशियाच्या पापुआ गिनी बेटावर राहणाऱ्या दानी समाजातील लोकांमध्ये आहे. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. (हे पण वाचा : ...म्हणून त्याने ऑर्केस्ट्रा आणला, डान्सर नाचवल्या आणि वाजतगाजत काढली वडलांची अंत्ययात्रा)
इंडोनेशियातील पापुआ गिनी बेटावर राहणारे दामी जमातीतील अनेक महिला कापलेल्या बोटांसह जगताना बघण्यात आल्या आहेत. यामागचं कारण एक जुनी परंपरा आहे. या परंपरेनुसार, परिवारातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी परिवारातील महिलेच्या दोन्ही हातांची काही बोटे कापली जातात.
आत्म्याच्या शांतीसाठी वेदनादायी 'शिक्षा'
The Guardian च्या एका रिपोर्टनुसार, येथील लोकांची या परंपरेमागचा असा समज आहे की, असं केल्याने मरणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. अशात महिलेच्या सोबत जे होतं ते अंगावर काटा आणणारं आहे. बोटं कापण्याआधी महिलेची बोटं दोरीने बांधली जातात. जेणेकरून रक्तप्रवाह थांबावा. त्यानंतर कुऱ्हाडीने बोटं कापली जातात.
कापलेली बोटांची तुकडे सुकवली जातात आणि नंतर ती जाळून राख केली जातात. ती राख एखाद्या विशेष ठिकाणी ठेवली जाते. आता ही परंपरा पापुआ गिनीमध्ये प्रतिबंधीत आहे. पण ही प्रथा अजूनही समाजातील काही वयोवृद्ध महिलांमध्ये बघता येते. आजही काही महिला बोट कापलेल्या स्थिती जगत आहेत.