'या' देशातील लोकांना आता फक्त 6 तास करावे लागणार काम, आठवड्यातून तीन दिवस मिळणार सुट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 02:43 PM2020-01-07T14:43:02+5:302020-01-07T15:11:40+5:30

सध्या या देशात लोक आठवड्यामध्ये पाच दिवस, 8 तासांसाठी काम करतात.

Finland’s new prime minister wants her country on a four-day workweek | 'या' देशातील लोकांना आता फक्त 6 तास करावे लागणार काम, आठवड्यातून तीन दिवस मिळणार सुट्टी 

'या' देशातील लोकांना आता फक्त 6 तास करावे लागणार काम, आठवड्यातून तीन दिवस मिळणार सुट्टी 

Next

फिनलंडच्या नव्या पंतप्रधान सना मरीन यांनी एक विधेयक सादर केले आहे. या विधेयकानुसार, आता देशातील सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 4 दिवस, सहा तासांसाठी काम करावे लागणार आहे. तसेच, या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. या निर्णयामुळे देशातील कर्मचारी वर्ग हा आपल्या कुटुंबीयांसोबत जास्त काळ राहू शकेल, असे पंतप्रधान सना मरीन यांचे मत आहे. 

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, "लोकांना आपले कुटुंब, चाहते आणि आपल्या मनपसंतीचे काम करण्यासाठी अधिक वेळ मिळाला पाहिजे. हे आपल्या कार्यकाळातील  पुढील पाऊल असू शकते." असे सना मरिन यांनी सांगितले. तसेच, सना मरीन यांनी सादर केलेल्या प्रस्तावाचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या कौशल्य क्षमतेत सुधार करण्याचा आहे. संसदेत सना मरीन यांनी हा प्रस्ताव सादर केल्यानंतर डाव्या आघाडीचे नेते आणि शिक्षणमंत्री ली एंडरसन यांनी या प्रस्तावाचे कौतुक केले आहे. फिनलंडमधील लोकांना कमी काम करण्याची परवानगी द्यावी. कारण, यामुळे लोकांची मदत होईल आणि मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण होईल, असेही सना मरीन यांनी यावेळी म्हटले आहे.   

सामान्यरित्या फिनलंडमध्ये लोक आठवड्यामध्ये पाच दिवस, 8 तासांसाठी काम करतात. तर फिनलंडच्या शेजारी असलेल्या स्वीडन देशात 2015 मध्ये 6 तास काम करण्याची पॉलिसी तयार करण्यात आली होती. यानंतर स्विडनमधील कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला. आधी काहीकाळ मायक्रोसॉफ्टने, जपान आणि युकेच्या एक कंपनी पॉर्टकुलिस लीगलने सुद्धा आठवड्यात तीन दिवस सुट्टी देण्याची पॉलिसी तयार केली होती. यानंतर येथील कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले आणि  कामाच्या गुणवत्तेत सुद्धा वाढ झाली होती. 

दरम्यान, स्वीडन, नॉर्वे आणि रशियाच्या सीमेवरचा देश म्हणजे फिनलंड. युरोपातील आठव्या क्रमांकाचा महाग देश असूनही तो श्रीमंत आणि सुरक्षित देश म्हणून ओळखला जातो. तिथं गुन्हेगारीचे प्रमाणही कमी आहे. बेटं आणि निसर्गरम्य सरोवरांचा हा देश स्री-पुरुष समानता आणि अभिनव शिक्षण-पद्धतीमुळे ओळखला जातो.

(जगातील सर्वात तरुण पंतप्रधान सना मरीन नक्की आहे कोण ?)

(जगातील सर्वात तरूण पंतप्रधान सना मरीन यांचा फिनलंड हा देश आहे कसा?)

Web Title: Finland’s new prime minister wants her country on a four-day workweek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.