क्या बात! घरात लागली होती आग, मग १० वर्षाच्या मुलीने जे केलं ते बघतच राहिले लोक!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 10:11 AM2021-03-23T10:11:00+5:302021-03-23T10:12:50+5:30
Wabash Avenue च्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. एक १० वर्षांची मुलगी आपल्या २ वर्षीय आणि ४ वर्षीय भावासोबत घरात होती.
एक दहा वर्षांची मुलगी घरात होती. तेव्हाच घरात अचानक आग लागली. सगळीकडे धुराचे लोळ होते. मुलीसोबत घरात तिचे दोन लहान भाऊही होते. अशात त्यांचा आणि आपला जीव वाचवण्यासाठी या मुलीने जे केलं बघून सगळे हैराण झालेत. सगळेच प्रश्नात पडले की, इतक्या लहान मुलीने हे केलं कसं?
ही घटना आहे अमेरिकेतील शिकागोची. येथील Wabash Avenue च्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. एक १० वर्षांची मुलगी आपल्या २ वर्षीय आणि ४ वर्षीय भावासोबत घरात होती. ते तिघेही अडकले होते. अशात मुलीने आधी खिडकी उघडली आणि तेथून एक गादी खाली फेकली.
6147 Wabash apartment fire . The children a girl age ten and two boys 4 and 2 were inside. The girl threw a mattress from third floor window and jumped. 4 year old rescued at window by ladder. CFD also got 2 year old from inside all taken to Comer serious. No adult at home. pic.twitter.com/Prbu8cPwBu
— Chicago Fire Media (@CFDMedia) March 18, 2021
मुलीने हिंमत दाखवली. तिने खिडकीतून गादीवर उडी घेतली. पण तिच्या पायाला यामुळे जखम झाली. इतक्यात फायर फायटर्स आले तेव्हा मुलीचा ४ वर्षाय भाऊ खिडकीतून उडी घेणार होता. सुदैवाने त्यांना वाचवण्यात आलं. दुसऱ्या भावालाही घरातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. दोन्ही भावांना काही झालं नाही. पण मुलीला जखम झाली.
District Fire Chief Frank Velez म्हणाले की, 'मी असं करायचा सल्ला कधीही कुणाला देत नाही. पण हे मान्य करावं लागेल की, मुलगी फारच इनोवेटिव होती. तिने लगेच स्वत:ला आणि आपल्या भावांना वाचवण्याचा विचार केला. असा विचार करण्यासाठी आणि प्रयत्न करण्यासाठी खरंच तिचं कौतुक करायला हवं'. मीडिया रिपोर्टनुसार, ही आग किचनमध्ये लागली होती. त्यावेळी घरात दुसरं कुणी नव्हतं.