असा दिसत होता जगातील पहिला डायनासॉर, इथे सापडली होती पहिले अवशेष!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 11:25 AM2024-01-05T11:25:03+5:302024-01-05T11:29:38+5:30
सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार विलियम यांना एका विशाल जीवाचे अवशेष सापडले होते. तो एक जबडा होता.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
आजपासून 200 वर्षाआधी लंडनच्या ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये नवीन जियोलॉजिकल सोसायटी बनली होती. जिओलॉजीचे पहिले प्रोफेसर बनले होते विलियम बकलॅंड (William Buckland) ज्यांनी जगाला सांगितलं की, डायनासॉरसारखा एक विशाल असायचा. त्यांनी या जीवाला नाव दिलं होतं मेगालोसौरस (Megalosaurus).
सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार विलियम यांना एका विशाल जीवाचे अवशेष सापडले होते. तो एक जबडा होता. जेव्हा त्यांनी याचा अभ्यास केला तेव्हा त्याचं नाव मेगालोसौरस ठेवलं. हे नाव डायनासॉर नावाच्या साधारण 20 वर्षाआधी पडलं होतं. हे अवशेष ब्रिटनच्या लोकल खदाणींमध्ये पडले होते. त्यावेळी कुणालाही या जीवाबाबत माहीत नव्हतं. जीवाचे दात बघून त्यांनी अंदाज लावला की, तो मांसाहारी असावा. त्यांनी असाही अंदाज लावला की, हा जीव 40 फूट उंच असावा आणि चारही पायांवर चालत असेल. त्यांच्यानुसार, मेगालोसौरस पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी रहात असेल.
लंडनच्या नॅचुरल हिस्ट्री म्यूजियमचे फाउंडर आणि वैज्ञानिक रिचर्ड ओवन यांनी पहिल्यांदा या जीवाला डायनासॉर असं नाव दिलं. त्यावेळी लंडनच्या क्रिस्टल पार्कमध्ये सन 1854 दरम्याने या जीवाची एक प्रतिमाही बनवण्यात आली होती ज्यात तो चार पायांवर उभा दिसत होता. नंतर पुढे जाऊन जेव्हा आणखी रिसर्च झाले तेव्हा समजलं की, हे जीव 4 नाही तर 2 पायांवर चालत होते. आजचे वैज्ञानिक मानतात की, हे जीव 6 मीटर लांब असायचे.
नॅशनल हिस्ट्री म्यूजियमनुसार डायनासॉर बाथोनियन काळात होते. म्हणजे आजपासून साधारण 16 कोटी वर्षाआधी ते होते. सीएनएननुसार, आतापर्यंत वैज्ञानिकांनी डायनासॉरच्या 1 हजार प्रजातींबाबत माहिती मिळवली आहे. 1990 दरम्यान डायनासॉरचा एक अवशेष सापडला होता ज्यात पंख होते. ज्यावरून हे दिसून येतं की, आजकालचे पक्षीही याच डायनासॉरपासून विकसित झाले आहेत. मेगालोसौरसबाबत बराच अभ्यास करण्यात आला. चार्ल्स डिकेन्स यानीही ब्लीक हाउस नावाच्या आपल्या पुस्तकात डायनासॉरचा उल्लेख केला होता.