हा ठरणार मूल जन्माला घालणारा पहिला ट्रान्सजेंडर

By admin | Published: February 9, 2017 12:43 PM2017-02-09T12:43:42+5:302017-02-09T12:52:45+5:30

ब्रिटनमधील एक 20 वर्षीय ट्रान्सजेंडर तरुण एका बाळाला जन्म देणार आहे. हेडन क्रॉस असे त्याचे नाव असून बाळाला जन्म देणारा तो पहिला ट्रान्सजेंडर पुरुष असल्याचे बोलले जात आहे.

This is the first transgender to take birth as a child | हा ठरणार मूल जन्माला घालणारा पहिला ट्रान्सजेंडर

हा ठरणार मूल जन्माला घालणारा पहिला ट्रान्सजेंडर

Next

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 9 -  ब्रिटनमधील एक 20 वर्षीय ट्रान्सजेंडर तरुण एका बाळाला जन्म देणार आहे.  हेडन क्रॉस असे त्याचे नाव असून बाळाला जन्म देणारा तो पहिला ट्रान्सजेंडर पुरुष असल्याचे बोलले जात आहे. गर्भधारणेसाठी त्याला सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून एक स्पर्म डोनर मिळाला आहे. तसे पाहायला गेले तर हेडन क्रॉस हा कायद्यानुसार पुरुष आहे पण जन्माला येताना त्याची शरीररचना मुलीच्या स्वरुपात झाली. हेडनला पूर्णतः पुरुष बनायचे आहे, तसे त्याचे उपचारही सुरू आहेत. पण याआधी त्यानं मुलाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 
 
दरम्यान,  हेडनला संप्रेरक उपचार (Hormone Treatment) पूर्ण करण्यापूर्वी नॅशनल हेल्थ सर्विसमध्ये (NHS) एग्स (अंडे)फ्रिज करण्याची सुविधा मिळवण्यात अपयश आले होते,त्यामुळे त्याने स्पर्म डोनर मिळाल्यानंतर मुलाला जन्म देण्याचा विचार काही काळ थांबवला होता. तसेच संप्रेरक प्रक्रियेपूर्वी NHSमध्ये एग (अंडे) फ्रीज करण्यासाठी जवळपास 24 लाख रुपये खर्च येणार होता.
 
 
मात्र, हेडनने चांगला बाबा होईन, असे सांगत सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी मुलाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी तत्काळ गर्भावस्था धारण करण्यासाठी ऑनलाइन निनावी दाता शोधणे भाग होते.  हार्मोन्स उपचार पूर्ण करण्यापूर्वी हेडनने बाळाला जन्म देण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. या शस्त्रक्रियेत त्याचा छातीचा भाग आणि अंडाशय हटवण्यात येणार आहे.
 

Web Title: This is the first transgender to take birth as a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.