बाप रे बाप! 'या' व्यक्तीने पकडला असा मासा की लोक बघून म्हणाले समुद्री राक्षस!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:55 PM2021-03-22T15:55:26+5:302021-03-22T16:00:51+5:30
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेतील ओरेगनमधील ३ वर्षीय Nate Iszac ने हा मासा पकडला आहे. त्याने याचे फोटो फेसबुकवर शेअर केले तर ते व्हायरल झाले.
मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीने असा मासा पकडला आहे ज्याला पाहून लोक समुद्री राक्षस म्हणत आहेत. व्हायरल फोटोमध्ये बघू शकता की, माशाचा आकार आणि त्याचं तोंड विचित्र व मोठं आहे. सोबतच त्याचे दात धारदार आणि खतरनाक दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेतील ओरेगनमधील ३ वर्षीय Nate Iszac ने हा मासा पकडला आहे. त्याने याचे फोटो फेसबुकवर शेअर केले तर ते व्हायरल झाले.
Nate ने ९ मार्चला या माशाचे शॉकिंग फोटो फेसबुकवर शेअर केले होते. त्याने याच्या कॅप्शनला लिहिले होते की, Wolf Eel. त्याची ही पोस्ट लगेच ३५० लोकांनी शेअरही केली. तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.
त्याने मुलाखतीत सांगितले की, 'जेम्ही या माशाला पाहिलं तेव्हा भीती आणि आनंद दोन्ही गोष्टी होत्या. मीच हा मासा पहिल्यांदा पाहिला होता आणि हा मासा किती जोरात चावतो हे मला माहीत होतं. तेव्हा आम्ही सतर्क होतो.
त्याने हा मासा ९ मार्चला पकडला होता. अलास्काच्या Akutan Island च्या समुद्रात हा मासा पकडण्यात आला होता. हा मासा Wolf Eel म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियावरील बरेच लोक म्हणाले की, हा मासा समुद्री राक्षसासारखा दिसतो. तर काही म्हणाले की, हा जीव फार शानदार आहे.