समुद्रात मासे पकडत होते लोक, तेव्हाच त्यांना दिसला 'बेबी ड्रॅगन'सारखा दिसणारा हा रहस्यमय जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 01:53 PM2022-04-07T13:53:15+5:302022-04-07T13:55:38+5:30
Baby Dragon : ३९ वर्षीय रोमन फेडोर्ट्सोव आपला सहकारी मॅकेरलसोबत नॉर्वेयिन सागरात मासे पकडण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यांना हा अजब जीव दिसून आला.
Baby Dragon : एका रशियन मच्छिमाराने समुद्रात एका अशा जीवाला शोधलं, जो विचित्र दिसतो. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा जीव पाहून लोक त्याला 'बेबी ड्रॅगन' म्हणू लागले आहेत. ३९ वर्षीय रोमन फेडोर्ट्सोव आपला सहकारी मॅकेरलसोबत नॉर्वेयिन सागरात मासे पकडण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यांना हा अजब जीव दिसून आला.
मरमंस्क येथील मच्छिमार वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र दिसणारे समुद्री जीव बघत असतात. पण या अनोख्या जीवाने त्यांना हैराण केलं. कारण हा जीव हुबेहुब बेबी ड्रॅगनसारखा दिसत होता. पण या जीवाची आता ओळख पटली आहे. रोमनने एक काइमेराला पकडलं, जो एक कार्टिलाजिनस मासा आहे. ज्याला घोस्ट शार्क असंही म्हटलं जातं.
रोमनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या जीवाचा एक फोटो शेअर केला आहे. माशाचे डोळे मोठे आहेत आणि एका लांब शेपटीही आहे. या माशाचा रंग हलका गुलाबी आहे. या जीवाला मोठे पंखही दिसत आहे. रोमनने लिहिलं की, 'एखाद्या नामहीन जीवाचा पाठलाग करणं वेगळी गोष्ट, पण त्याला शोधणं एक बाब आहे'.
या जीवाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यावर २२ हजारांपेक्षा जास्त लाइक्स याला मिळाले आणि लोक यावर मजेदार कमेंट्सही करत आहेत. जास्तीत जास्त लोक हा फोटो बघून हैराण झालेत कारण त्यांनी असा जीव आधी कधीही पाहिला नाही.