'पाच वर्ष स्वर्गात...!' क्लिनिकली डेड झाली होती महिला, सांगितलं 'मृत्यू'नंतर काय काय पाहिलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:50 PM2023-01-31T17:50:45+5:302023-01-31T17:51:57+5:30
ही घटना 6 मे, 2001 ची आहे. तेव्हा सकाळच्या सुमारास क्रॅमर बाथरूमकडे जात होत्या. तेव्हाच अचानकपणे त्यांचा मृत्यू झाला होता.
एका महिलेने स्वर्गासंदर्भात मोठा दावा केला आहे. आपण तेथे गेलो होतो आणि पाच वर्ष राहूनही आलो, असे या महिलेने म्हटले आहे. मात्र, तिने केलेल्या या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे सांगितले जाऊ शकत नाही. द मिररच्या वृत्तानुसार, लिंडा क्रॅमर नावाची ही महिला 14 मिनिटांहूनही अधिक काळ क्लिनिकली डेड होती. तिचे म्हणणे आहे की, तिने माउंट एव्हरेस्टहूनही 30,000 पट मोठी पर्वत रांग पाहिली. क्रॅमरने मरणोत्तर जीवनाशी संबंधित अनुभव शेअर केले आहेत.
वृत्तानुसार, ही घटना 6 मे, 2001 ची आहे. तेव्हा सकाळच्या सुमारास क्रॅमर बाथरूमकडे जात होत्या. तेव्हाच अचानकपणे त्यांचा मृत्यू झाला होता. क्रॅमर यांचे म्हणणे आहे की त्यांचा प्रवास येथेच थांबला नव्हता. जेव्हा डॉक्टर त्यांना वाचवत होते, तेव्हा त्या स्वर्गात गेल्या होत्या. दुसऱ्यांदा श्वास आल्यानंतर क्रॅमर यांनी हे अनुभव सांगितले आहेत. त्या म्हणाल्या, आपण जेवढ्यावेळ स्वर्गात होतो, तो वेळ आपल्याला पाच वर्षं एवढा दीर्घ वाटला. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत क्रॅमर यांनी दावा केला, की त्या हवेत होत्या, तेव्हा डॉक्टर त्यांच्यावर ट्रिटमेंट करत होते. यानंतर त्यांनी मृत्यूनंतरचे जीवन पाहिले.
अनेक पटिंनी मोठा पर्वत पाहिल्याचा दावा -
यासंदर्भात बोलताना क्रॅमर यांनी भूतलावर नाहीत अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, 'मी एका फुलांनी व्यापलेल्या भागात उभी आहे, असे मला दिसले. मी माउंट एव्हरेस्टपेक्षाही 30,000 पट मोठी असलेली परवत रांग पाहत होते. मी जेथे होते, त्यामागे एक मोठी पर्वत श्रृंखला होती. मी गगनचुंबी इमारती पाहू शकत होते. मी तलाव पाहिले, मला सुंदर दृश्ये पाहता आली.' यातच, न्यूरोसायंटिफिक रिसर्च मधून समजते की, एनडीई (निअर डेथ एक्सपेरिअन्स) एक अशी घटना आहे, जी 'शारीरिक मल्टीसेन्सरी इंटीग्रेशन'मधील समस्येमुळे निर्माण होते. महत्वाचे म्हणजे, जेव्हा एखाद्या कारणामुळे आपला जीव धोक्यात असेल, तेव्हा असे होते.
अशा स्थितीत लोक विविध प्रकारच्या अनुभवासंदर्भात माहिती देत, काही सकारात्मक आणि काही नकारात्मक गोष्टी सांगतात. एनडीईदरम्यान सर्वसाधारणपणे लोक मृत्यू पावलेले नातलग, धार्मिक व्यक्ती आणि शरीराबाहेर आत्म्याच्या स्वरुपात मिळालेले अनुभव सांगतात.