वेदनादायी! 10 वर्षांनी मुलगा झाला पण छोट्याशा जखमेमुळे गमावला; शरीरात शिरला बॅक्टेरिया अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 01:30 PM2023-02-17T13:30:41+5:302023-02-17T13:40:44+5:30
ट्रेडमिलवर धावताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या शरीरात असे बॅक्टेरिया शिरले ज्याचा त्याच्या संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम झाला
आपल्याला अनेक वेळा लागतं. दुखापती होतात पण आपण त्या गोष्टी हलक्यात घेतो. छोटं-मोठं औषध लावतो. काही उपचार करत नाहीत पण अमेरिकेतील एका 11 वर्षाच्या मुलाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. ट्रेडमिलवर धावताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या शरीरात असे बॅक्टेरिया शिरले ज्याचा त्याच्या संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम झाला आणि शेवटी मुलाचा मृत्यू झाला.
जेसी ब्राउनच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीनुसार, जेसी व्यायाम करत असताना पडला होता. दुखापतीच्या ठिकाणी जखम झाली त्याला आयसीयूमध्ये नेण्यात आले, तेथे त्याला विचित्र संसर्ग झाल्याचे आढळून आले. बॅक्टेरियामुळे जेसीच्या मेंदूला सूज आली आणि त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या 10 वर्षानंतर जेसीचा जन्म झाला होता. म्हणूनच त्याचे पालक त्यांना चमत्कारिक मूल मानत होते. तो इतका हुशार होता की त्याने BMX आणि Motocross सारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
जखम व्यवस्थित स्वच्छ करा
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरचे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. एलन क्रॉस यांनी या बँक्टेरियाचे वर्णन अत्यंत धोकादायक असं केलं आहे. ते म्हणाले की, हा ग्रुप ए चा सदस्य आहे आणि संसर्ग खूप वेगाने पसरतो. त्यामुळे शरीरात विष निर्माण होतं. त्यांनी स्पष्ट केलं की या प्रकारचे संक्रमण मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये छोट्याशा ओरखड्यांपासून मोठ्या जखमांपर्यंत होऊ शकते. ते म्हणाले, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रथम जखमेची नीट साफसफाई करणे आणि नंतर त्यावर योग्य उपचार करणे. जखम कधीही दुर्लक्षित करू नये.
कोलकात्यातही एकाचा मृत्यू
काही वर्षांपूर्वी, कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये याच संसर्गामुळे 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृण्मय रॉय असं मृताचे नाव आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय भाषेत याला नेक्रोटाइझिंग फासिसायटिस म्हणतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.