उडत्या विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला पायलट, प्रवाशांची उडाली झोप; नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:55 PM2022-06-13T17:55:32+5:302022-06-13T17:55:43+5:30
Flight emergency landing: एका प्रवाशाने वैमानिकाला टॉयलेटमध्ये जाताना पाहिले, पण तो परत आलाच नाही.
Flight emergency landing:विमान प्रवासाचा आनंद प्रत्येकालाच घ्यायचा असतो, पण विमान प्रवासातील एक छोटीशी चूक कोणाच्याही जीवावर बेतू शकते. हवेत उडणाऱ्या इझीजेट विमानाच्या बाबतीतही असेच घडले. या विमानाचे एडिनबर्ग विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मात्र, यामागचे कारण कोणतीही गडबड नसून वैमानिकाची प्रकृती खालावली होती.
नेमकं काय झालं?
इझीजेट फ्लाइट क्रमांक EZY6938 ने रविवारी सकाळी हेराक्लिओन, ग्रीस येथून स्कॉटिश राजधानीसाठी उड्डाण केले. पण उड्डाणाच्या मध्येच असे काही घडले की विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. 'डेलीस्टार'च्या वृत्तानुसार, अचानक विमानातून इमर्जन्सी लँडिंगचा संदेश आल्यावर एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना धक्का बसला. त्यानंतर लगेचच अलर्ट जारी करण्यात आला. एवढेच नाही तर या घोषणेनंतर विमानातील प्रवासीही घाबरले होते.
आजारी पायलट टॉयलेटमध्ये अडकला
एडिनबर्ग विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तत्पूर्वी विमानतळावर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या. विमानातील एका प्रवाशाने सांगितले की, त्याने फ्लाइटच्या पायलटला टॉयलेटमध्ये जाताना पाहिले, पण बाहेर येताना दिसला नाही. त्यावेळेस एका तरुण वैमानिकाकडून विमान चालवले जात होते. त्यानेच कॅप्टनच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे इमर्जन्सी लँडिंगची माहिती दिली.
विमान कंपनीने एक निवेदन जारी केले
प्रवाशाने सांगितले की, विमानात वैमानिक सुमारे 13 तास ड्युटीवर असल्याची माहिती देण्यात आली होती, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. तो टॉयलेटला गेला आणि तिथे त्यांची प्रकृती आणखी बिघडली. ते बाहेरही पडू शकले नाही. विमानाने सुरुवातीला 45 मिनिटे उशिराने उड्डाण केले होते. आले. याबाबत विमान कंपनीनेही निवेदन जारी करत घडलेला सर्व प्रकार सांगितला.