विमानात मोबाईल Flight Mode वर का ठेवला जातो? जाणून घ्या, सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 04:55 PM2022-10-05T16:55:08+5:302022-10-05T16:55:54+5:30
flight mode : विमान उडण्यापूर्वी फोनला फ्लाय मोडमध्ये ठेवण्यास का सांगितले जाते याचा कधी विचार केला आहे का?
नवी दिल्ली : जर तुम्ही विमानाने प्रवास केला असेल तर तुम्हाला काही विमान उड्डाण करण्यापूर्वी काही सूचनांचे पालन करण्यास सांगितले जाते. यातच तुम्ही अनेकदा ऐकले असेल की फ्लाइटच्या आधी मोबाईल फोन फ्लाइट मोडवर (Flight Mode) ठेवण्यास सांगितले जाते. फ्लाइट मोडमध्ये, फोन चालू राहतो, परंतु कॉल करता येत नाहीत आणि इंटरनेट वापरता येत नाही. पण, विमान उडण्यापूर्वी फोनला फ्लाय मोडमध्ये ठेवण्यास का सांगितले जाते याचा कधी विचार केला आहे का?
दरम्यान, विमान उड्डाण करण्यापूर्वी प्रवाशांनी मोबाईल फोन फ्लाईट मोडमध्ये ठेवणे आवश्यक आहे. त्याबद्दल विमानाच्या आत घोषणा केली जाते. उड्डाणावेळी फोनचा वापर विमानाच्या नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टममध्ये व्यत्यय आणू शकतो किंवा योग्यरित्या कमी करण्यात समस्या निर्माण करू शकतो. म्हणूनच फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
मोबाईल फोन फ्लाइट मोडमध्ये न ठेवल्याने गंभीर समस्या उद्भवू शकतात. जर विमानात फ्लाइट मोड चालू नसेल तर मोबाईल फोनच्या सिग्नलचा विमानाच्या कम्युनिकेशन सिस्टमवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे वैमानिकाला संवाद साधण्यात अडचण येऊ शकते. पायलटला कंट्रोलेबल कम्युनिकेशन बनवण्यात अडचण येऊ शकते आणि त्यामुळे विमानाचा मार्ग चुकू शकतो किंवा अपघात होऊ शकतो.
याचबरोबर, फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवल्यानंतर, तुम्ही फोटो क्लिक करण्यासाठी, आधीच सेव्ह केलेले व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी स्मार्टफोन वापरू शकता. मात्र, या काळात कॉल करता येणार नाहीत आणि इंटरनेटही वापरता येणार नाही.