समुद्री लाटांवर तरंगणारा स्वप्नातील लक्झरी बंगला, ३९.४३ कोटी रूपये आहे याची किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 01:14 PM2019-11-20T13:14:30+5:302019-11-20T13:17:30+5:30
सतत बदलणाऱ्या जगाच्या लक्झरी जगण्याच्या व्याख्याही बदलत आहेत. सामान्यपणे एका मोठ्या घरात सर्वच आरामदायक आधुनिक सुविधा असणे याला सामान्यपणे लक्झरी लाइफ म्हटलं जातं.
सतत बदलणाऱ्या जगाच्या लक्झरी जगण्याच्या व्याख्याही बदलत आहेत. सामान्यपणे एका मोठ्या घरात सर्वच आरामदायक आधुनिक सुविधा असणे याला सामान्यपणे लक्झरी लाइफ म्हटलं जातं. पण असं वाटतं की, आता ही बाब सुद्धा जुनी झाली आहे. Arkup एक लक्झरी यॉर्ट असून याला एका व्हिलाचं रूप देण्यात आलं आहे. म्हणजे हा बंगला ४३०० स्क्वेअर फूट आकाराचा आहे. याची खासियत म्हणजे हा बंगला पाण्यावर तरंगणारा आहे.
काय आहे याची खासियत?
या यॉर्टमधे सर्वच आधुनिक सुविधा आहेत. म्हणूनच याची किंमत ५.५ मिलियन डॉलर म्हणजे साधारण ३९.४० कोटी रूपये इतकी आहे. या यॉर्टमधे इलेक्ट्रिक इंजिन दिलं असून सोलर पॅनलही आहे. म्हणजे यात पर्यावरणाचा देखील विचार करण्यात आला आहे.
४ बेडरूमचा अजून काय हवं?
या व्हिलामधे ४ बेडरूम, एक लिव्हिंग रूम, एक किचन, ४ बाथरूम आणि एक स्विमिंग प्लॅटफॉर्म आहे. याच्या छतावर सोल प्लेट्स लावण्यात आल्या आहेत. तसेच यात पावसाचं पाणी शुद्ध कऱण्यासाठी एक प्युरिफिकेशन सिस्टीमही आहे. यात ४ हजार गॅलन इतकं पाणी स्टोर केलं जाऊ शकतं.
अनेक सुविधा असल्या तरी हा व्हिला समुद्री वादळ किंवा चक्रीवादळात टिकण्यास सक्षम नाही. त्यामुळे हा व्हिला स्थिर पाण्यात वापरला जातो. Arkup चे को-डिझायनर निकोलस डी सांगतात की, 'तुम्ही याने जगभरात फिरू शकत नाही. पण याला तुम्ही बहामास आणि ब्रिटीश व्हर्जिन आइसलॅंड इत्यादी ठिकाणी घेऊन जाऊ शकता'.
साधारणपणे याचा वापर जास्त लांबच्या प्रवासासाठी होऊ शकत नाही. पण तरीही काही लोकांकडून याची ऑर्डर मिळाली तर कंपनी असा पाण्यावर तरंगणारा बंगला तयार करून देण्यास तयार आहे.