नदीला आला अंड्यांचा महापूर, गोळा करण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:19 PM2021-07-29T15:19:13+5:302021-07-29T15:19:49+5:30

Jara Hatke News: कालव्यामधून पांढऱ्या रंगाची कसली तरी वस्तू वाहत येत असल्याचे लोकांनी पाहिले. त्यानंतर जवळ जाऊन पाहिले असता नदीमधून अंडी वाहत येत असल्याचे निष्पन्न झाले.

A flood of eggs came to the river, people jumped to collect | नदीला आला अंड्यांचा महापूर, गोळा करण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या

नदीला आला अंड्यांचा महापूर, गोळा करण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या

Next

लखनौ - उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यामध्ये शारदा कालव्यात रहस्यमयरीत्या हजारोंच्या संख्येने अंडी वाहताना दिसल्याने खळबल उडाली आहे. (Jara hatke) शारदा कालव्यामधून पांढऱ्या रंगाची कसली तरी वस्तू वाहत येत असल्याचे लोकांनी पाहिले. त्यानंतर जवळ जाऊन पाहिले असता नदीमधून अंडी वाहत येत असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब हळूहळू संपूर्ण गावात पोहोचली. त्यानंतर शेकडो लोक नदीच्या किनाऱ्यावर जमा झाले आणि त्यांनी अंडी गोळा करण्यास सुरुवात केली. (A flood of eggs came to the river, people jumped to collect)

हरदोई जिल्ह्यातील हरियावा ठाणे क्षेत्रातील अछुवापूर गावाबाहेर असलेल्या शारदा कालव्यामध्ये गावातील लोकांना अचानक नदीमधून काही पांढरी वस्तू वाहत येत असल्याचे दिले. त्यानंतर गावातील लोकांनी उचलून पाहिले असता ती पांढरी वस्तू म्हणजे अंडी होती. नदीमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंडी वाहून येत असल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. यादरम्यान, अंडी गोळा करण्यासाठी काही ग्रामस्था नदीच्या किनाऱ्यावर बसले. तर काही तरुणांनी तर अंडी काढण्यासाठी कालव्यामध्ये उड्या घेतल्या. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबडीची अंडी कालव्यामध्ये कुठून आली याची माहिती मिळू शकलेली नाही. 

जवळपास दोन तासांपर्यंत कालव्यामधून अंडी वाहून येत होती. त्यानंतर अंडी वाहून येणे बंद झाले. याबाबत ग्रामस्थ रानू मिश्रा यांनी सांगितले की, आमच्या गावाजवळून शारदा कालवा जातो. या कालव्यामध्ये आज पांढऱ्या वस्तू दिसत होत्या. तेव्हा कुतुहल म्हणून लोक जवळ गेले तेव्हा ती पांढरी वस्तू म्हणजे अंडी असल्याचे निष्पन्न झाले. कुणीतरी नदीत अंडी सोडली असावीत आणि अनेक तास दिसत राहिली असावीत, असे या ग्रामस्थाने सांगितले. 

Web Title: A flood of eggs came to the river, people jumped to collect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.