नशीबवान! मुलीसाठी स्कूल बॅग घेण्यासाठी गेले होते वडील, परत येताना अचानक बनले कोट्याधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 05:22 PM2021-08-14T17:22:26+5:302021-08-14T17:26:13+5:30
ब्रूक्सविलेमध्ये राहणारा ४७ वर्षीय क्लीवलॅंड पोपने फ्लोरिडा लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, तो मुलीसाठी स्कूल बॅग खरेदी करण्यासाठी गेला होता.
माणसाचं नशीब कधी बदलेल काही सांगता येत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अमेरिकेतील एक व्यक्ती गेला होता आपल्या मुलीसाठी स्कूल बॅग खरेदी करायला. पण तिथे खरेदी केलेल्या एका लॉटकी तिकिटाने तो ७ कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्तीचा मालक झाला.
फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीने सांगितलं की, तो त्याच्या मुलीसाठी स्कूल बॅग खरेदी करण्यासाठी गेला होता आणि तिथे एक स्क्रॅच-ऑफ लॉटरी तिकीट खरेदी करण्याचा विचार त्याच्या मनात आला. ज्यातून तो १ मिलियन डॉलर म्हणजे ७,४२,१७,००० चा जॅकपॉट जिंकला. ब्रूक्सविलेमध्ये राहणारा ४७ वर्षीय क्लीवलॅंड पोपने फ्लोरिडा लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, तो मुलीसाठी स्कूल बॅग खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याने लॉटरीचं तिकीट घेतलं.
तो म्हणाला की, मी माझ्या मुलीसाठी एका खास बॅगचा शोध घेत होतो. त्या ठिकाणी मला लॉटरीचं तिकीट दिसलं आणि मी ते खरेदी केलं. लॉटरी विजेत्याने सांगितलं की, त्याला याचा अंदाजही नव्हता की, तो या तिकिटातून एका झटक्यात १ मिलियन डॉलर म्हणजे सात कोटी रूपये जिंकेल.
लॉटरी जिंकलेल्या पोपने जिंकलेला सर्व पैसा एकत्र मागितला आहे. तसेच त्याच्याकडून त्याने ज्या स्टोरमधून लॉटरी तिकिट खरेदी केलं त्याला २ हजार डॉलरची बोनस कमीशन देण्यात आलं आहे.