टॉस करून कपलने ठरवलं लग्नानंतर नावासमोर कुणाचं सरनेम लावायचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 12:48 PM2020-01-01T12:48:15+5:302020-01-01T12:50:21+5:30

लग्नानंतर मुलींना त्यांचं सरनेम म्हणजेच त्यांचं आडनाव बदलावं लागतं. ही प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे.

Florida newlyweds flipped coin at wedding to choose their surname | टॉस करून कपलने ठरवलं लग्नानंतर नावासमोर कुणाचं सरनेम लावायचं?

टॉस करून कपलने ठरवलं लग्नानंतर नावासमोर कुणाचं सरनेम लावायचं?

Next

लग्नानंतर मुलींना त्यांचं सरनेम म्हणजेच त्यांचं आडनाव बदलावं लागतं. ही प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. पण फ्लोरिडातील एका कपलने ही प्रथा तोडण्यासाठी असं काही केलं की, तुम्हीही त्यांचं कौतुक कराल. फ्लोरिडातील या ख्रिश्चन कपलचं नाव Jeff Conley आणि Darcy Ward आहे.

लग्नानंतर मुलींना त्यांच्या पतीचं सरनेम त्यांच्या नावासमोर लावावं लागतं. पण या कपलने एकमेकांना ५०-५० संधी देत एका नाण्याच्या माध्यमातून हे ठरवलं आहे की, ते लग्नानंतर कुणाचं सरनेम वापरतील. त्यांनी एक नाणं घेऊन त्यावर दोघांचे सरनेम लिहिले होते. यात Darcy नाव आलं. त्यानंतर दोघांना सगळ्यांनी Mr. And Mrs. Darcy म्हणून शुभेच्छा दिल्या.

Jeff ला Palm Beach Post ला सांगितले की, 'मी फ्लोरिडातील कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. मला कोणत्याही गोष्टीत इमानदारी आणि ट्रान्सपरन्सी हवी असा माझा विचार आहे.

नर्स असलेली Darcy म्हणाली की, 'एका क्रिएटीव्ह आणि मोकळ्या विचारांच्या माणसासोबत लग्न करणं, नव्या आयुष्याची सुरूवात करणं माझ्यासाठी फार महत्वाचं वाटतं. 

लग्नानंतर सरनेम बदलण्याची प्रथा बदलण्याची ही पद्धत फारच भन्नाट आहे. हे कपल एकमेकांना टिंडरवर भेटलं होतं. नंतर एकमेकांनी प्रपोज केलं. Darcy ने गुडघ्यावर बसून आणि Jeff ने त्यांचं आवडीचं गाणं गाउन एकमेकांना प्रपोज केलं होतं.


Web Title: Florida newlyweds flipped coin at wedding to choose their surname

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.