एलिअन्स कसे दिसत असतील, कोणत्या रंगाचे असतील? पहिल्यांदाच वैज्ञानिकांचा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 10:47 AM2024-04-18T10:47:17+5:302024-04-18T10:47:51+5:30

एका सायंटिस्टने पहिल्यांदाच सांगितलं की, एलिअन्स जर कुठे असतील, तर कसे दिसत असतील. 

For the first time scientists revels colour of aliens | एलिअन्स कसे दिसत असतील, कोणत्या रंगाचे असतील? पहिल्यांदाच वैज्ञानिकांचा दावा...

एलिअन्स कसे दिसत असतील, कोणत्या रंगाचे असतील? पहिल्यांदाच वैज्ञानिकांचा दावा...

एलिअन्सबाबत रोज नवनवीन दावे केले जातात. ते पृथ्वी येत असल्याचंही म्हटलं जातं. पण याचे ठोस असे काहीच पुरावे नाहीत किंवा ठोसपणे सिद्ध करू शकले नाहीत. पण वेगवेगळ्या थेअरी सांगितल्या जातात. सायन्स फिक्शनमध्ये वर्षानुवर्षे हेच सांगण्यात आलंय की, एलिअन्स मनुष्यांसारखे दिसत नाहीत. ते रंगीतही असू शकत नाहीत किंवा जांभळ्या रंगाचेही नसतात. ते हिरव्या रंगांचेही नसतील. पण एका सायंटिस्टने पहिल्यांदाच सांगितलं की, एलिअन्स जर कुठे असतील, तर कसे दिसत असतील. 

कॉनेल वैज्ञानिकांच्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जर ते पृथ्वीसारख्या ग्रहावर राहत असतील, तो ग्रहही आपल्या पृथ्वीसारखं हिरवं नसेल. वेगळा असेल आणि त्यामुळे एलिअन्सही वेगळ्या रंगाचे असतील. 

वैज्ञानिकांनुसार, एलिअन्स जांभळ्या रंगाचे असू शकतात. कारण ते बॅक्टेरियांनी झाकलेले गेलेले असतील. अशा ठिकाणाहून येतील जिथे फार कमी किंवा कोणताही दृश्य प्रकाश नाही. पृथ्वीवरही असे अनेक जीव असतात ज्यांचा रंग जांभळा असतो. हे रंग अंतराळातही दिसतात.

मेट्रोच्या रिपोर्टनुसार, रिसर्च टीमचे प्रमुख आणि कार्ल सगन इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर डॉ. लिगिया फोंसेका कोएल्हो म्हणाले की, जांभळे बॅक्टेरिया अनेक प्रकारच्या परिस्थितीमध्ये वाढू शकतात. त्यामुळे ते कशाही स्थितीत जिवंत राहू शकतात. होऊ शकतं की, ते जगभरात पसरू शकतील. वैज्ञानिक अशा रंगांचा शोध घेत आहेत जे इतर ग्रहांवर असू शकतात. त्यांच्यानुसार, जांभळा रंग प्रायमरी रंग आहे. याने टोमॅटो लाल, गाजर केशरी दिसण्यास मदत होते. याच्यात पिवळ्या, केशरी आणि लाल रंगाला बदलण्याची क्षमता आहे.

पृथ्वी होते आधी होते असे जीव

वैज्ञानिकांनुसार, जांभळ्या रंगाचे बॅक्टेरिया झाडांच्या तुलनेत फार कमी प्रकाशातही जिवंत राहू शकतात. ते क्लोरोफिलच्या अनेक रूपांचा वापर करतात जे झाडांना सूर्यपासून मिळणाऱ्या प्रकाशाला जेवणात रूपात बदलण्यास मदत करतात. या रिअॅक्शनमध्ये ऑक्सिजनचं उत्पादन होत नाही. म्हणजे त्यांना ऑक्सिजनची गरज नसते. असं मानलं जातं की, अशा प्रकारचे जीव पृथ्वीवर आधी होते.
 

Web Title: For the first time scientists revels colour of aliens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.