प्यारवाली लव्हस्टोरी! "त्याला पाहताच मी वेडी झाली...."; ब्राझीलची तरुणी पडली भारतीयाच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 12:03 PM2023-01-26T12:03:15+5:302023-01-26T12:04:25+5:30

साहिल असं भारतीय तरुणाचं नाव असून गर्लफ्रेंड मारिया ब्राझीलची आहे.

foreign girl fell in love with an indian boy left her country and came to india | प्यारवाली लव्हस्टोरी! "त्याला पाहताच मी वेडी झाली...."; ब्राझीलची तरुणी पडली भारतीयाच्या प्रेमात

फोटो - आजतक

Next

ब्राझीलची मुलगी आणि भारतातील एक तरुण चीनमध्ये भेटले. दोघेही प्रेमात पडले, पण नंतर हे दोघे आपापल्या देशात परतले. यानंतर दोघांनी वेगवेगळ्या टाईमझोनमध्ये राहून लाँग डिस्टेंस रिलेशनशिप सुरू केले. आता या जोडप्याने एकत्र राहण्यास सुरुवात केली असून आपली प्यारवाली लव्हस्टोरी शेअर केली आहे. योग्य वेळ आल्यावर लग्न करणार असल्याचं या कपलचं म्हणणे आहे. 

साहिल असं भारतीय तरुणाचं नाव असून गर्लफ्रेंड मारिया ब्राझीलची आहे. साहिलने सांगितले की, मारिया आणि तो व्यवसायाने मॉडेल आहेत. पहिली भेट कशी झाली? यावर साहिलने सांगितले की, तो मॉडेलिंगच्या संदर्भात चीनला गेला होता, मारियाही चीनमध्ये होती. संध्याकाळी तो एका रेस्टॉरंटमध्ये गेला. साहिल हसला आणि म्हणाला- मारिया मला पाहून वेडी झाली होती, तिने माझ्यासारखा मुलगा कधीच पाहिला नव्हता. तसेच मारियाने देखील हेच सांगितलं. 

रेस्टॉरंटमधील या भेटीनंतरच आमचा संवाद सुरू झाला. साहिलने सांगितले की, 26 ऑक्टोबरला माझा वाढदिवस होता. या दिवशीही आम्ही दोघे भेटलो, त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो. चीनमधील भेटीनंतर आम्ही दोघेही आपापल्या देशात आलो. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहताना खूप त्रास झाल्याचं साहिलने मान्य केलं. ब्राझीलमध्ये दिवस होता तेव्हा भारतात रात्र होती. एकदा तर त्यांनी एकमेकांना सोडण्याचा विचारही केला.

काही वेळाने साहिलने मारियाला सांगितले की त्याला तिची त्याच्या पालकांशी ओळख करून द्यायची आहे. यानंतर मारिया पुन्हा दिल्लीत आली आणि साहिलच्या पालकांना भेटली. मारियाला पाहून साहिलच्या कुटुंबीयांनाही खूप आनंद झाला. साहिलने सांगितले की, त्याने मारियाची पहिली ओळख त्याच्या आजीशी केली होती. साहिलने सांगितले की, मारियाला पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तिच्या सौंदर्याची खूप प्रशंसा केली. साहिलने सांगितले की तो मारियासोबत लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये आहे. योग्य वेळ आल्यावर ते एकमेकांशी लग्नही करतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: foreign girl fell in love with an indian boy left her country and came to india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.