भारतामधील या गावातील पुरुषांपासून प्रेग्नन्ट होण्यासाठी येतात परदेशी महिला! विचित्र आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 01:42 AM2023-07-12T01:42:15+5:302023-07-12T01:44:19+5:30
अनेक परदेशी महिलांची येथील पुरुषांपासून प्रेग्नन्ट होण्याची इच्छा असते. तर, जाणून घेऊयात या अनोख्या गावासंदर्भात आणि येथील लोकांसंदर्भात...
भारत हा विविध प्रकारच्या संस्कृतींनी नटलेला देश आहे. येथे अशी अनेक ठिकाणं आहेत, जी अद्यापही अनेकांना माहीत नाहीत. येथील अनेक जमाती आजही कॅमेऱ्यापासून दूर आपापल्या गटात राहणेच पसंत करतात. असेच एक गाव लडाखमध्ये आहे. या गावाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या गावाची खासियत म्हणजे येथील पुरुष. अनेक परदेशी महिलांची येथील पुरुषांपासून प्रेग्नन्ट होण्याची इच्छा असते. तर, जाणून घेऊयात या अनोख्या गावासंदर्भात आणि येथील लोकांसंदर्भात...
खरे तर लद्दाख, येथील सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, येथील कार्गिलपासून केवळ 70 किलोमिटर अंतरावर असलेले आर्य व्हॅली, हे गाव येथील पुरुषांसाठी प्रसिद्ध आहे. यागावात युरोपातून मुली आणि महिला आई बनण्याच्या इच्छेने येतात आणि प्रेग्नन्ट झाल्यानंतर, पुन्हा आपापल्या देशात परततात. परदेशी मुलींच्या या इच्छेमागील कारणही तसे चकित करणारेच आहे.
इतिहासाची पानं उलटली, तर आपल्या लक्षात येईल की, सिकंदर भारतात पराभूत झाल्यानंतर परतत असताना, त्याच्या सैन्यातील काही लोक ज्या गावात राहिले, त्या गावाला आर्यन व्हॅली, असे नाव देण्यात आले. त्यांना ब्रोकोपा जमातीचे सदस्य मानले जाते आणि सिकंदराच्या सैन्याचे वंशज म्हटले जाते. आता हे आर्यन व्हॅली गाव याच जमातीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. युरोपातील महिला, आपल्यालाही सिकंदराप्रमाणे मुल व्हावे, या इच्छेने येथे येतात आणि येथील ब्रोकोपा जमातीच्या पुरुषापासून प्रेग्नन्ट झाल्यानंतर, पुन्हा आपल्या देशात निघून जातात.