समुद्राखाली लपून राहतात एलिअन्स, NASA च्या माजी रिसर्चरचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 12:11 PM2023-12-23T12:11:05+5:302023-12-23T12:11:44+5:30

Aliens : या दाव्याआधी एका एक्सपर्टने सांगितलं की, एलिअन्स दिसण्यापासून वाचण्यासाठी आपल्या सोलर सिस्टीमच्या बाहेर अंधार असलेल्या स्थानांवर लपून राहतात.

Former Nasa scientist says aliens secret base under earth oceans | समुद्राखाली लपून राहतात एलिअन्स, NASA च्या माजी रिसर्चरचा दावा

समुद्राखाली लपून राहतात एलिअन्स, NASA च्या माजी रिसर्चरचा दावा

Aliens : एलिअन्सबाबत दररोज वेगवेगळे दावे केले जातात. यूएफओला यांच्यासोबत जोडून बघितलं जातं आणि असं म्हटलं जातं की, ते पृथ्वीवर पुन्हा पुन्हा येतात. ब्रिटनमध्ये अडीच वर्षाच्या आत साधारण 1000 यूएफओ बघण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. या दाव्याआधी एका एक्सपर्टने सांगितलं की, एलिअन्स दिसण्यापासून वाचण्यासाठी आपल्या सोलर सिस्टीमच्या बाहेर अंधार असलेल्या स्थानांवर लपून राहतात. तोच आता नासाच्या एका माजी अभ्यासकाने वेगळाच दावा केला आहे.

या अभ्यासकानुसार, यूएफओचे पालयट आपल्या महासागरांच्या खाली असू शकतात. 2001 ते 2005 पर्यंत नासाच्या Ames रिसर्च सेंटरमध्ये काम करणारे केविन नुथ यांचं मत आहे की, अशी अनेक कारणे आहेत ज्यात एलिअन्स पृथ्वीच्या तळावर राहण्याऐवजी पाण्याखाली राहून आपल्या नजर ठेवत असतील.

ते म्हणाले की, जर त्यांना लपून रहायचं असेल तर समुद्राचा तळ त्यांच्यासाठी बेस्ट पर्याय असेल. ते तिथे बेस बनवून राहत असतील. त्यांनी थेअरीज ऑफ एवरीथिंग पॉडकास्टला सांगितलं की, पृथ्वीचा 75 टक्के भाग पाण्यात आहे आणि त्या पाण्यापर्यंत आपली पोहोच फार कमी आहे. त्यामुळे एलिअन्ससाठी ही जागा सगळ्यात सेफ आहे.

नुकत्याच बघण्यात आलेल्या यूएफओमध्ये अशा विमानाचा समावेश आहे जे हवा आणि समुद्रात सहजपणे चालतं. केविन म्हणतात की, जर हे एक्वेटिक इन्वायरमेंटमधून असतील तर त्यांच्यासाठी हे अधिक चांगलं आहे.

ते म्हणाले की, एटमोस्फेअरमध्ये हीट कॅपेसिटी कमी असते. त्यामुळे तापमानात फार व्हेरिएशन असतं. एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाताना तुम्हाला तापमानात बराच फरक दिसतो. 

ते पुढे म्हणाले की, अशात केवळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहिल्याने अनेक समस्या होऊ शकतात. पण जर तुम्ही समुद्रात राहत असाल तर समुद्र असलेल्या एखाद्या दुसऱ्या ग्रहावर जाणं खूप सोपं होतं. ओशियनचं तापमान 32 डिग्री फॅरेनहाट आणि 212 डिग्री फॅरेनहाट दरम्यान असतं. त्यामुळे समुद्रापासून ओशियनपर्यंत एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर गेल्यावरच्या तापमानात नाटकीय रूपाने बदल होतो.

Web Title: Former Nasa scientist says aliens secret base under earth oceans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.