जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण, इथे जेम्स बॉन्ड काय त्याचा पप्पाही पोहोचू शकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 04:34 PM2019-02-22T16:34:06+5:302019-02-22T16:40:53+5:30

जर तुम्ही गुगलवर जाऊन जगातलं सर्वात मजबूत आणि सुरक्षित ठिकाण कोणतं? असं सर्च कराल तर तुम्हाला उत्तर मिळेल की, फोर्ट नॉक्स.

Fort Knox most heavily guarded place on the planet | जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण, इथे जेम्स बॉन्ड काय त्याचा पप्पाही पोहोचू शकणार नाही!

जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण, इथे जेम्स बॉन्ड काय त्याचा पप्पाही पोहोचू शकणार नाही!

Next

Source: Businessinsider

जर तुम्ही गुगलवर जाऊन जगातलं सर्वात मजबूत आणि सुरक्षित ठिकाण कोणतं? असं सर्च कराल तर तुम्हाला उत्तर मिळेल की, फोर्ट नॉक्स. ही अमेरिकेची ती तिजोरी आहे, ज्यात सगळं सोनं ठेवण्यात आलं आहे. इथे साधारण ५० हजार टन सोनं ठेवण्यात आलं आहे. हे जगभरातील सोन्याचं २.५ टक्के सोनं आहे.

या सोन्याची किंमत १२, ६०००० कोटी रूपये इतकी सांगितली जाते. त्यामुळे अर्थातच इथे सुरक्षा अशी आहे की, इथे पक्षीही घुसू शकत नाही. या कारणानेच या ठिकाणाला पृथ्वीवरील सर्वात सुरक्षित तिजोरी म्हटलं जातं. १९३६ मध्ये तयार करण्यात आलेली ही बिल्डींग कोणत्याही प्रकारचं हल्ला परतवून लावण्यासाठी सक्षम आहे. 

३० हजार सैनिक तैनात

फोर्ट नॉक्समध्ये अमेरिकेचा खजिना तर ठेवला आहेच सोबतच हे ठिकाण एक मिलिट्री बेसही आहे. याच्या सरक्षेसाठी ३० हजार जवान तैनात आहेत. अमेरिका ज्या ज्या शस्त्रास्त्रांचा युद्धात वापर करते, ती सगळी शस्त्रास्त्रे या इमारतीच्या सुरक्षेसाठीही आहेत. 
चारही बाजूंनी ४ भींती उभारण्यात आल्या आहेत. यातील दोनमध्ये वीजेचा करंट आहे. इतर दोन इमारतींना अमेरिकन जवान गार्ड करतात. सोबतच इथे आजूबाजूला लॅन्ड माइन्सही लावण्यात आले आहेत. 

रोबोट्सचाही होतो वापर

जर कुणी यातून मार्ग काढून जिवंत राहिलं तरी कॅमेराच्या नजरेतून त्यांचं वाचणं कठीण आहे. इथे कॅमेरांचां कडक बंदोबस्त आहे. त्यासोबतच इथे सुरक्षेसाठी रोबोट्सचाही वापर केला जातो. समजा कुणी इमारतीपर्यंत पोहोचलं तर त्याचा सामना जवान आणि कॅमेरांशी होईल. जर यांना चुकवून कुणी आणखी पुढे गेलं तर त्याच्यासमोर ४ फूट उंच भींत उभी राहणार. ही भींत ७५० टन ग्रेनाइट आणि स्टीलपासून तयार आहे. ही इमारत उडवली जाईल. 

२२ टनाचा तिजोरीचा दरवाजा

वेगवेगळ्या सिनेमात तुम्ही अनेक तिजोरी पाहिल्या असतील. पण ही तिजोरी खरंच त्याहून वेगळी आहे. या तिजोरीच्या दरवाज्याचं वजन २२ टन इतकं आहे. हा दरवाजा उघडण्यासाठी अर्थातच पासवर्डची गरज असते. हे पासवर्ड वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये असतात. काही लोक सोडता कुणालाच पूर्ण कोड माहिती नसतो. 

Source: thingsthatsuck.info

इतकेच नाही तर या मोठ्या तिजोरीमध्ये असलेल्या छोट्या छोट्या लॉकर्समध्ये सोनं ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी पासवर्डची गरज पडेल. समजा कुणी आत शिरलं आणि त्याने सोनं मिळवलं तरी तेवढ्या वेळात कुणीतरी आत गेल्याची बातमी पोहोचेल. तेव्हा बाहेर सैन्याची फौज उभी असेल. 

म्हणजे बघा ना वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण जेम्स बॉन्डला कुठच्या कुठे जाताना बघतो. तो कुठेही काहीही करून शिरतो. पण इतक्या सुरक्षेच्या ठिकाणी तर जेम्स बॉन्डचा पप्पाही जाऊ शकणार नाही. 

 

Web Title: Fort Knox most heavily guarded place on the planet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.