रहस्य : 'इथे' जमिनीतून दर सेकंदाला निघतं ३०० लीटर पाणी, वैज्ञानिकांनाही सापडला नाही सोर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 12:15 PM2021-11-19T12:15:36+5:302021-11-19T12:21:14+5:30
Fosse Dionne Spring in France : इथे हजारो वर्षापासून जमिनीतून रहस्यमयपणे दर सेकंदाला ३०० लीटरपेक्षा जास्त पाणी सतत निघत राहतं. मात्र, आजपर्यंत वैज्ञानिकांना हे रहस्य उलगडता आलेलं नाही.
आपण आता २१व्या शतकात जगत आहोत आणि विज्ञानाने फार जास्त प्रगती केली आहे. तरी सुद्धा जगात असे काही रहस्य आहेत जे चमत्कारापेक्षा कमी नाहीत. इतकंच काय तर हजारो वर्षांपासून अनेक रहस्यांवरून (Mysterious Spring in France) पडदाच उठलेला नाही. असंच एक रहस्य फ्रान्सच्या बरगंडी राज्यातील टोनेरे नावाच्या शहरात आहे. इथे हजारो वर्षापासून जमिनीतून रहस्यमयपणे दर सेकंदाला ३०० लीटरपेक्षा जास्त पाणी सतत निघत राहतं. मात्र, आजपर्यंत वैज्ञानिकांना हे रहस्य उलगडता आलेलं नाही.
फ्रान्समध्ये जमिनीतून निघत असलेल्या या पाण्याला फॉसे डिओनी स्प्रिंग (Fosse Dionne Spring in France) असं नाव देण्यात आलं आहे. वैज्ञानिकांनी जमिनीतून सतत निघत असलेल्या या पाण्याच्या स्त्रोताबाबत जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण आजपर्यंत हे रहस्य त्यांना उलगडता आलेलं नाही.
पावसाळ्यात ३ हजार लीटर पाणी निघतं
फॉसे डिओनी स्प्रिंगमधून प्रति सेकंदाला जमिनीतून ३०० लीटर पाणी निघतं. केवळ इतकंच नाही तर पावसाळ्यात इथे प्रति सेकंदाला ३ हजार लीटर पाणी निघतं. वैज्ञानिकांना हेही समजू शकलेलं नाही की, पावसाळ्यात अचानक इतकं जास्त
पाणी इथून निघतं कसं?
या ठिकाणाला लोक निसर्गाचा चमत्कार मानतात. असं सांगितलं जातं की रोमन लोक या झऱ्याचं पाणी पिण्यासाठीही वापरत होते. तेच १७व्या शतकात या झऱ्यावर लोक आंघोळ करत होते. १८व्या शतकात वैज्ञानिकांनी या झऱ्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.
जो आत गेला परत आलाच नाही
असं सांगितलं जातं की, फॉसे डिओनी स्प्रिंगचा जलस्त्रोत शोधण्यासाठी जे कुणी आत गेले ते कधीच परतले नाहीत. जे लोक आत गेले त्यांच्या मृत्यू झाला. तेव्हापासून लोक आत जाण्यास घाबरतात. १९७४ मध्ये एक व्यक्ती पाण्याचा स्त्रोत शोधण्यासाठी आत गेला होता, पण त्याचा मृत्यू झाला. नंतर १९९६ मध्ये अशाप्रकारे एकाचा मृत्यू झाला होता.