उडणाऱ्या डायनासोरचे अवशेष आढळले; स्कॉटलंडमध्ये १६ करोड वर्षांपूर्वी होते वास्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 08:56 AM2024-02-11T08:56:25+5:302024-02-11T08:56:40+5:30
या प्रजातीला ‘सियोप्टेरा इवान्से’ असे नाव दिले आहे. ‘सियो’चा अर्थ धुके असा आहे, तर ‘टेरा’ शब्द लॅटिन आहे.
एडिननबर्ग : पृथ्वीवर हजारो वर्षांपूर्वी महाकाय डायनासोर अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे आतापर्यंत समोर आले आहेत. स्कॉटलंडमधील संधोधकांनी अलीकडेच ‘ऑइल ऑफ स्काय’ या परिसरात डायनासोरच्या आणखी एका प्रजातीचे अवशेष शोधून काढले आहेत. याला पंख असल्याचे दिसून आले आहे. पंख असलेला हा टेरोसोर मध्य जुरासिक कालखंडात १६ करोड वर्षांपूर्वी राहत होता.
- सामान्यपणे पंख असलेले डायनासोर आतापर्यंत चीनमध्ये आढळतात. स्कॉटलंडमध्ये या प्रकारातील डायनासोरचे अवशेष आढळत नाहीत. डायनासोर आणि मगरीचे मिश्रण
- स्कॉटलंडच्या संशोधकांना महाकाय टेकड्यांमध्ये डायनासोरच्या सांगाड्याचे केवळ काही भाग आढळले आहेत. यात खांदा, पंख, पाय आणि मणक्याचा भाग आहे.
- संशोधकांनी दावा केला आहे की, ही हाडे टेरोसोर प्रजातीची आहेत. ही प्रजाती मगर आणि डायनासोर दोन्हींशी जोडलेली आहे. मगरीप्रमाणे यांना मोठी शेपटी असते, तसेच मोठे पंखही असतात.
- सापडलेले अवशेष चीनमध्ये आढळणाऱ्या डार्विनोप्टेरा या डायनासोरच्या समूहाशी संबंधित आहेत. सर्वप्रथम याचे अवशेष चीनमध्येच आढळले होते.
कसे विकसित झाले हे गूढ?
जर्नल ऑफ वर्टिबेट पेलियोन्टोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की, स्कॉटलंडमध्ये आढळलेल्या टेरोसोरचे संपूर्ण चित्र बनविणे शक्य नाही. आढळलेले सापळे संख्येने अधिक आहेत, तेही लहान-लहान तुकड्यांमध्ये आढळत आहेत. मध्य ज्युरासिक कालखंडापासून असलेले अवशेष तितकेसे सुस्पष्ट नसल्याने त्यांचे आरेखन करण्यात अनेक अडचणी येत आहेत. हे नेमके कसे विकसित झाले, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
कसे केले नामकरण?
या प्रजातीला ‘सियोप्टेरा इवान्से’ असे नाव दिले आहे. ‘सियो’चा अर्थ धुके असा आहे, तर ‘टेरा’ शब्द लॅटिन आहे. ‘इवान्से’ हा शब्द ब्रिटिश संशोधक सुसान इ इवांस यांच्या नावावरून घेतला आहे. ‘इवांस’ यांनी ‘ऑइल ऑफ स्काय’मध्ये संशोधनात अनेक वर्षे व्यतित केली.