पंढरपुरात व्हॉट्स अ‍ॅपच्या चार अ‍ॅडमिन्सला अटक

By admin | Published: August 12, 2015 02:19 AM2015-08-12T02:19:13+5:302015-08-12T08:50:40+5:30

गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांमध्ये चोर, दरोडेखोर घुसल्याचा संदेश पाठवून भीती पसरविणाऱ्या व्हॉट्स अ‍ॅपच्या चार गु्रप अ‍ॅडमिनसह नऊ जणांना पंढरपूर

Four Admins of the WhitS App Stunkers at Pandharpur | पंढरपुरात व्हॉट्स अ‍ॅपच्या चार अ‍ॅडमिन्सला अटक

पंढरपुरात व्हॉट्स अ‍ॅपच्या चार अ‍ॅडमिन्सला अटक

Next

पंढरपूर : गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांमध्ये चोर, दरोडेखोर घुसल्याचा संदेश पाठवून भीती पसरविणाऱ्या व्हॉट्स अ‍ॅपच्या चार गु्रप अ‍ॅडमिनसह नऊ जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली़
सोलापूर जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून रात्री चोर, दरोडेखोर येत असल्याची चर्चा गावागावांत होत आहे़ त्या भीतीने ग्रामीण भागातील लोक अख्खी रात्र जागून काढत आहेत़ व्हॉट्स अ‍ॅपद्वारे फॉरवर्ड होणाऱ्या संदेशांमुळे या अफवा वेगाने पसरल्या़
पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ या तालुक्यांत चोरट्यांच्या अफवा पसरवत काल्पनिक फोटोही अपलोड करून व्हायरल करण्याचे काम जोरात सुरू होते.
पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना आदेश देऊन अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
पंढरपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्यात येत असल्याचे समोर येताच सोमवारी रात्री अफवेखोर अ‍ॅडमिनच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)

असे आहेत ग्रुप
विठ्ठल मंदिर परिसर, फ्रेंडशिप फॉरेव्हर, छत्रपती, मैत्री या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन व ग्रुपमधील पाच सदस्यांवर कारवाई झाली.


५0 मोबाइल तपासले
पंढरपूर तालुका पोलिसांनी एका तरुणाच्या मोबाइलची तपासणी केली असता, त्याच्याच मोबाइलवर तीन ग्रुप सापडले. त्याच आधारे तपास केला असता आणखी एक ग्रुप आढळला. दिवसभर ५0 मोबाइलची तपासणी करण्यात आली.

Web Title: Four Admins of the WhitS App Stunkers at Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.