मरता-मरता चार लोकांना नवं जीवन देऊन गेली महिला, ब्रेन हॅमरेजने गमावला होता जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 12:12 PM2021-05-29T12:12:23+5:302021-05-29T12:12:52+5:30
ही आहे दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमधील. इथे ४३ वर्षीय महिलेने तिचे अवयव दान केले. ही महिला हायपरटेंसिवची शिकार होती.
नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीमध्ये एका महिलेने मरता-मरता चार लोकांना जीवनदान दिल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने स्वत:चा जीव तर गमावला मात्र चार लोकांसाठी ती देवदूत ठरली आहे. महिलेने अवयव दान करून चार लोकांचा जीव वाचवला.
ही आहे दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमधील. इथे ४३ वर्षीय महिलेने तिचे अवयव दान केले. ही महिला हायपरटेंसिवची शिकार होती. अचानक तिला उलट्या सुरू झाल्या आणि जोरात डोकं दुखू लागलं होतं. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या महिलेचा कोविड टेस्टही निगेटिव्ह आली होती.
ब्रेन हॅमरेजने घेतला जीव
गेल्या २० मे रोजी महिलेला सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये इमरजन्सी डिपार्टमेंटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिची स्थिती सतत गंभीर होत होती. टेस्टमधून समोर आलं की, महिलेला ब्रेन हॅमरेजची तक्रार आहे. डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तसं काही होऊ शकलं नाही. डॉक्टरांनी महिलेला ब्रेन डेड घोषित केलं.
ही माहिती मिळताच महिलेच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. महिला सात भावांना एकुलती एक बहीण होती. आता तिच्या मागे पती आणि एक २१ वर्षीय मुलगा आहे.
हॉस्पिटलमध्ये महिलेच्या नातेवाईकांची काउन्सेलिंग केलं गेलं आणि त्यांना महिलेचे अवयव दान करण्यासाठी तयार करण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की, ते महिलेच्या आठवणी जिवंत ठेवू शकतात. नंतर महिलेचा परिवार अवयव दानासाठी तयार झाला. अशाप्रकारे महिलेने मरता मरता काही लोकांचा जीव वाचवला.
हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने महिलेचे अवयव काढले आणि एका ५८ वर्षीय व्यक्तीमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट केलं होतं. ही व्यक्ती दोन वर्षापासून वेटींग लिस्टमध्ये होती. त्यांनी जगण्याची आशा सोडली होती. तसेच ब्रेन डेड झाल्यानंतर महिलेचं हृदय एम्समधील एका रग्णाला देण्यात आलं.