एक असं म्युझिअम जिथे कपडे काढून जातात लोक, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:43 AM2024-08-30T11:43:39+5:302024-08-30T11:49:58+5:30

हे म्युझिअम फ्रान्समधील मार्सिले शहरात आहे, ज्याला मार्सिले म्युझिअम म्हणून ओळखलं जातं. म्युझिअममध्ये यूरोपमधील निसर्गवादाचा इतिहास दर्शवणारे नग्न चित्र लावण्यात आले आहेत.

France marseille museum opens up naturist exhibition to nude visitors | एक असं म्युझिअम जिथे कपडे काढून जातात लोक, जाणून घ्या कारण...

एक असं म्युझिअम जिथे कपडे काढून जातात लोक, जाणून घ्या कारण...

जगात अनेक अजब ठिकाणं असतात ज्यांबाबत वाचून किंवा ते ठिकाणं पाहून लोक अवाक् होतात. फ्रान्समध्ये असंच एक म्युझिअम आहे. इथे डिसेंबरपर्यंत दर महिन्यात केवळ एक दिवस एक अनोखी प्रदर्शनी लागते. आश्चर्याची बाब म्हणजे या म्युझिअममध्ये प्रवेश करण्यासाठी लोकांना न्यूड होण्याची परवानगी दिली जाते. 

हे म्युझिअम फ्रान्समधील मार्सिले शहरात आहे, ज्याला मार्सिले म्युझिअम म्हणून ओळखलं जातं. म्युझिअममध्ये यूरोपमधील निसर्गवादाचा इतिहास दर्शवणारे नग्न चित्र लावण्यात आले आहेत आणि लोकांनी नग्न होऊन हे चित्र पहावे असा विचार आहे. 
एएफपीच्या वृत्तानुसार, या प्रदर्शनीमध्ये कलेचे अनेक नमूने जसे की, फोटो, सिनेमे, पेंटिंग्स, मॅगझिन, मूर्ती आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टी फ्रान्स आणि आणखी एका देशातील निसर्गवादी समुदायांकडून आणि प्रायव्हेट कलेक्शनमधून गोळा करण्यात आल्या आहेत. 

म्युझिअममध्ये न्यूड व्हिजिटर्सची घोषणा अनेक लोकांसाठी धक्कादायक होती. इंग्लंडमधून आलेले दोन लोक हे बघून अवाक् झाले की, इथे नग्नतेबाबत किती लिबरेटेड वातावरण आहे. किरेन पार्कर-हॉल आणि जेंडर पॅरी जे नग्न होऊ म्युझिअममध्ये फिरत होते. त्यांनी एएफपीला सांगितलं की, ही त्यांना जीवनात एकदा मिळणारी संधी होती. कारण इंग्लंडमध्ये असं काही होत नाही. 

हे म्युझिअम अशा लोकांसाठी फार चांगलं आहे ज्यांना बाहेर नग्न होऊ फिरणं पसंत आहे. मग अनेकांना प्रश्न पडतो की, कपडे घातलेले लोक या एक्झिबिशनमध्ये जाऊ शकतात की, नाही? तर यावर एका प्रवक्त्याने सांगितलं की, हे जरा अजब आहे. कारण तिकीट बुक करणाऱ्यांनी काही प्रमाणात नग्न अवस्थेत राहणं लॉजिकल आहे. 

Web Title: France marseille museum opens up naturist exhibition to nude visitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.