जगातली सर्वात महागडी कॉफी, २२ वर्ष जुन्या कॉफीच्या एक कपाची किंमत वाचून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:40 AM2019-09-23T11:40:45+5:302019-09-23T11:44:12+5:30
फार फार तर एक कप कॉफी किती महाग असावी, याचा अंदाज लावला तर कोणी १ हजार रूपये सांगतील तर कुणी २ हजार रूपये.
सामान्यपणे तुम्ही कॉफी शॉपमध्ये कॉफी प्यायला असाल तर दीडशे ते दोनशे रूपये बिल झालं असावं. फार फार तर एक कप कॉफी किती महाग असावी, याचा अंदाज लावला तर कोणी १ हजार रूपये सांगतील तर कुणी २ हजार रूपये. पण जपानमधील ओसाका शहरात एक असं कॉफी हाऊस आहे, जिथे २२ वर्ष जुनी कॉफी मिळते. आणि या कॉफीच्या एका कपासाठी ग्राहकांना तब्बल ६५ हजार रूपये इतकी किंमत मोजावी लागते.
या कॉफीला जगातली सर्वात जुनी आणि सर्वात महागडी कॉफी म्हटलं जातं. ही कॉफी आपल्या वेगळ्या टेस्टसाठी ओळखली जाते. पण या कॉफीचा शोध एका चुकीने लागला होता. त्यानंतर ही कॉफी जगभरात लोकप्रिय झाली.
काय झाली होती चूक?
मंच हाऊस जगातला एकमेव असा कॅफे आहे, जिथे दोन दशकांरपेक्षा अधिक जुनी कॉफी ताजी सर्व्ह केली जाते. कॅफेचे मालक तनाका कधीकाळी आइस कॉफी विकत होते. त्यामुळे ते कॉफी फ्रीजमध्ये ठेवत होते. जेणेकरून कॉफी लवकर तयार व्हावी. पण एकदा कॉफीचे काही पॅकेट्स फ्रीजमधून ठेवून ते विसरले. हे पॅकेट दीड वर्ष तसेच राहिलेत. जेव्हा तनाका यांची त्या पॅकेटवर नजर गेली तेव्हा त्यांनी ती कॉफी फेकण्याऐवजी त्याची कॉफी तयार केली. तनाका यांना बघायचं होतं की, कॉफीच्या टेस्टमध्ये किती फरक आलाय.
तनाका यांनी सांगितले की, 'जेव्हा मी दीड वर्ष जुनी कॉफी ग्राइंड करून तयार केली. तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. कारण कॉफी अजूनही पिण्या लायक होती. यात वेगळी वेगळा सुगंध होता आणि वेगळीच टेस्ट होती. मी ठरवले की आता कॉफी काही वर्ष स्टोर करणार आणि एक वेगळ्या टेस्टची कॉफी ग्राहकांना देणार'.
तनाका यांनी कॉफी १० वर्ष स्टोर करून ठेवण्यासाठी लाकडांच्या छोट्या छोट्या बॉक्सचा वापर केला. जेव्हा १० वर्षांनंतर याची टेस्ट घेतली तेव्हा कॉफी सीरपसारखी लागली. त्यानंतर तनाका यांनी २० वर्षांपर्यंत कॉफी स्टोर केली तेव्हा त्यांना कॉफीची टेस्ट अल्कोहोलसारखी वाटली. जी ग्राहकांना फार पसंत आली.
लाकडाच्या बॅरलमध्ये स्टोर करतात कॉफी
तनाका कॉफीच्या बीया बारीक केल्यानंतर कापडाच्या चाळणीमध्ये टाकतात. त्यानंतर यावर गरम पाणी टाकलं जातं. या टेक्नीकमध्ये कॉफीचा एक थेंब निघण्याला ३० मिनिटांचा वेळ लागतो. पण त्यानंतर कॉफीला जी टेस्ट येते, ती वेगळाच अनुभव देते.
या टेक्नीकने कॉफीचा कडवटपणा दूर होतो. नंतर कॉफी लाकडाच्या बॅरलमध्ये स्टोर केली जाते. दोन दशकांनंतर कॉफी बॅरेलमध्ये लावण्यात आलेल्या नळातून काढली जाते. याची टेस्ट चॉकलेटी आणि काही प्रमाणात मद्यासारखी असते. ही कॉफी सर्वसामान्यांसाठी फार महागडी आहे. पण जे लोक टेस्टसाठी पैसे खर्च करू शकतात, त्यांना ही कॉफी नक्कीच आवडेल.