गर्भापासून आतापर्यंत...३१ वर्ष दररोज मुलाचा फोटो काढतात वडील; कारण ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 11:03 AM2023-04-01T11:03:21+5:302023-04-01T11:05:09+5:30
कॉरीचा जन्म १९९१ मध्ये झाला. कॉरी घराबाहेर कुठे गेला तरी इयान त्याचा फोटो काढण्यासाठीत अनेक किमी प्रवास करतात.
एक व्यक्ती गेल्या ३ दशकांपासून दररोज स्वत:च्या मुलाचा फोटो घेत होता. जेव्हा हा मुलगा आईच्या गर्भात होता तेव्हापासून तो असं करतोय. हा व्यक्ती असं का करत असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र मुलाचा फोटो घेण्यामागचं या व्यक्तीनं सांगितलेले कारण ऐकून कुणीही हैराण होईल. इंग्लंडमध्ये राहणारा ६६ वर्षीय इयान मकलियोड गेल्या ३१ वर्षापासून मुलगा कॉरी मकलियोड याचे फोटो घेतायेत.
कॉरीचा जन्म १९९१ मध्ये झाला. कॉरी घराबाहेर कुठे गेला तरी इयान त्याचा फोटो काढण्यासाठीत अनेक किमी प्रवास करतात. मोबाईल फोनच्या जमान्यात हे काम खूप सोपे झाले. कॉलेजच्या दिवसात आणि त्यानंतरही कॉरी सेल्फी क्लिक करून त्याच्या वडिलांना फोटो पाठवायचा. फॉक्स न्यूज रिपोर्टनुसार, कॉरीने सांगितले की, माझे वडील इयान यांना १९९१ पासून दरदिवशी माझा फोटो घेण्याची आयडिया आली. त्यावेळी ते वाइन पित होते. ही गोष्ट इंटरनेटच्या पहिल्यापासून सुरू आहे. सुरुवातीला काही वर्ष हे फोटो घेऊन त्याचे फोटो कॉपी बुक बनवतील असा विचार इयान यांच्या मनात आला.
इयान यांचे तेव्हापासून एक छोटसं आर्ट प्रोजेक्ट आहे परंतु जेव्हा त्यांनी फोटो घ्यायला सुरु केलं तेव्हापासून ही सवय कायम राहिली. माझे वडील क्रिएटिव्ह आहेत असं कॉरीनं म्हटलं. त्याचसोबत जर मी माझ्या मित्राच्या घरी गेलो तरी मध्यरात्रीही माझा फोटो घेण्यासाठी तिथे यायचे. मला त्रास व्हायचा. मी शाळेच्या पिकनिकला गेलो तिथे टिचरला माझा फोटो घेण्यास सांगितले. आतापर्यंत या फोटोंची संख्या ११ हजाराहून अधिक झालीय असं कॉरीनं सांगितले. कॉरी सध्या जगभ्रमंती करतोय. ६० हून अधिक देशात त्याने प्रवास केला. यूट्यब आल्यानंतर या प्रोजेक्टला एक टाइम लॅप्स फिल्म बनवण्यात आले. एकदा कॅमेरा खराब झाला, एकदा चोरीला गेला. त्यामुळे अनेक फोटो गायब झाले.
का घ्यायचे दररोज फोटो?
इयान मकलियोड यांनी म्हटलं की, मी जर दरदिवशी मुलाचा फोटो घेतला तर काय होईल? जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा प्रवास पाहणे किती अचंबित करणारा आहे. मी हे काम अखेरपर्यंत करणार आहे. कॉरीच्या जन्मापासूनच मी रोज फोटो घेण्याचा निर्णय घेतला होता. मला माहिती नाही हे मी किती दिवस करू शकेन. कदाचित आणखी काही वर्ष...परंतु ज्यादिवशी काम थांबवायला लागेल तो दिवस कठीण असेल. फोटोबद्दल माझे काही नियम आहेत. मी दुपारी १२ ते रात्री १२ या काळातला फोटो घेतो. जर मध्यरात्रीनंतर वेळ झाला आणि मी योग्यस्थळी पोहचलो नाही तर २४ तासाचा कालवधी उलटतो. त्यामुळे फोटो खराब होतो असं त्यांनी सांगितले.