धक्कादायक! गोठलेल्या धबधब्याखाली फिरत होते लोक, टोकदार बर्फाच्या तुकड्याखाली दबून एकाचा मृत्यू....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 10:52 AM2021-01-09T10:52:42+5:302021-01-09T10:55:42+5:30
रशियातील कामचाट्का प्रायद्वीपमध्ये विल्यूचिंस्की धबधबा पर्यटकांसाठी जीवघेणा ठरला. गुरूवारी ही घटना घडली.
(Image Credit : Gatty Image/Aajtak.in)
कोसळणारे धबधबे नेहमीच सुंदर असतात. पण ते धोकादायकही असतात. रशियात एका गोठलेला धबधबा खाली फिरत असलेल्या पर्यटकांसाठी जीवघेणा ठरला. जेव्हा पर्यटक धबधब्याखाली होते तेव्हा गोठलेला धबधब्यातील एक मोठा बर्फाचा तुकटा खाली असलेल्या एका व्यक्तीवर पडला. यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झालेत.
रशियातील कामचाट्का प्रायद्वीपमध्ये विल्यूचिंस्की धबधबा पर्यटकांसाठी जीवघेणा ठरला. गुरूवारी ही घटना घडली. टोकदार बर्फाचा तुकडा खाली पडल्याने त्याच्या वजनाने एका पर्यटकाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत.
रशियातील आपातकालीन मंत्रालयाने सांगितले की, १३० फूट उंच या धबधब्यातील बर्फ तुटल्याने चार लोक याखाली दबले. त्यांना वाचवण्यासाठी ४० लोकांची रेस्क्यू टीम बोलवण्यात आली होती. रेस्क्यू ऑपरेशन रात्री साडे दहा वाजता संपलं.
एका तरूणाला आजूबाजूला असलेल्या लोकांनी बर्फाखालून खेचून काढलं. असे सांगितले जाते की, हे सर्व पर्यटक रशियातील खाबारोव्सक शहरातील होते. जखमींना लगेच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
विल्यूचिंस्की धबधबा १३० फूट उंच एका एका डोंगरावर तयार झालेल्या ग्लेशिअरमधून निघालेलं पाणी गोठल्याने तयार झाला. हा हिवाळ्यात नेहमीच गोठतो. सायबेरियन टाइम्सच्या वृत्तानुसार, दरवर्षी हिवाळ्यात आसपासचे शेकडो लोक इथे फिरायला येतात.