घरात सुरू होती महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी, तेव्हा अचानक घरातील लोक आनंदी झाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 11:03 AM2022-11-28T11:03:18+5:302022-11-28T11:03:38+5:30

Woman dies and comes back to life: कोणत्याही परिवारात कुणाचं निधन झालं तर घरात दु:खाचं सावट असतं. गोरखपूरच्या देवरिया जिल्ह्यातील बेलवा बाजार गावातही असंच घडलं होतं.

Funeral preparations were going on in house then dead woman became alive Uttar Pradesh | घरात सुरू होती महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी, तेव्हा अचानक घरातील लोक आनंदी झाले...

घरात सुरू होती महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी, तेव्हा अचानक घरातील लोक आनंदी झाले...

Next

Woman dies and comes back to life: उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका घरात परिवारातील एका सदस्याच्या मृत्यूचा दुखवटा सुरू होता. सूचना मिळताच घरातील लोक महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी करू लागले होते. पण अचानक मृत महिला जिवंत झाली.

कोणत्याही परिवारात कुणाचं निधन झालं तर घरात दु:खाचं सावट असतं. गोरखपूरच्या देवरिया जिल्ह्यातील बेलवा बाजार गावातही असंच घडलं होतं. इथे राहणारी 55 वर्षीय मीना देवी यांना श्वासासंबंधी गंभीर आजार होता. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

सोमवारी रोज त्यांची तब्येत जास्त बिघडत होती. त्यानंतर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी सकाळी मीना देवी यांना सुट्टी देण्यात आली होती. मीना देवी यांचा मुलगा जेव्हा त्यांना घरी घेऊन येत होता तेव्हा रस्त्यातून येता येता त्याने घरी फोन केला की, आईचा श्वास थांबला आहे. हे ऐकताच परिवारावर शोककळा पसरली.

घरी या घटनेची सूचना मिळताच घरातील लोकांनी महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. घरात दु:खाचं सावट होतं. तेव्हाच मुलाने फोन केला की, आई जिवंत आहे. त्यानंतर मीना देवी यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता महिलेच्या घरातील लोक आनंदी आहेत.

Web Title: Funeral preparations were going on in house then dead woman became alive Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.