"सौंदर्यवान पत्नी हवी", उद्योगपतीनं जाहिरात दिली, अन् एका चुकीमुळे नेटिझन्सनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 07:02 PM2020-10-21T19:02:58+5:302020-10-21T19:07:39+5:30

शिक्षण आणि चांगल्या हुद्द्यावर काम करत असतानाही काही जणांची विचार करण्याची पद्धत अजूनही बदलेली नाही.

Funny shaadi ad effluent industrialist asks for fair bride troll due to wrong spelling 4 | "सौंदर्यवान पत्नी हवी", उद्योगपतीनं जाहिरात दिली, अन् एका चुकीमुळे नेटिझन्सनी उडवली खिल्ली

"सौंदर्यवान पत्नी हवी", उद्योगपतीनं जाहिरात दिली, अन् एका चुकीमुळे नेटिझन्सनी उडवली खिल्ली

Next

ज्याप्रमाणे देश बदलत आहे. त्याचप्रमाणे लोकांचे विचार, राहणीमान आणि विचार करण्याची पद्धतही बदलत आहे. पण अजूनही काही लोक असे आहेत. ज्यांचे विचार खूपच मागासलेले आहेत. इतकंच नाही तर उच्च शिक्षण आणि चांगल्या हुद्द्यावर काम करत असतानाही काही जणांची विचार करण्याची पद्धत अजूनही बदलेली नाही. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका घटनेचं उदाहरण देणार आहे.

सध्याच्या काळात  लग्न करताना रंग, रूप, पैसे यांहीपेक्षा जास्त विचार, शिक्षण, राहणीमान यांना मुलं मुली महत्व देतात. पण इथे मात्र एक विचित्र प्रकार घडला आहे. एका उद्योगपती असलेल्या माणसाने लग्नासाठी मुलगी शोधण्यासाठी पेपरात जाहिरात दिली होती. ही जाहिरात पाहिल्यानंतर जाहिरात देणाऱ्यावर सोशल मीडिया युजर्सनी टिकेचा भडीमार केला आहे. 

युजर @suitcaseindia ने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नवरी हवीये, Effluent industrialist साठी.  ही जाहिरात देणाऱ्या माणसाने स्पेलिंग चुकीचं लिहील्यामुळे अर्थाचा अनर्थ झाला. Affluent (संपन्न) लिहीण्याऐवजी Effluent (कचरा, सांडपाणी) असा चूकीचा शब्द  लिहिला. ही चूक पकडल्यानंतर नेटिझन्सनी या उद्योगपतीची चांगलीच खिल्ली उडवली आहे. कडक सॅल्यूट! रुग्णवाहिकेचा अभाव, २ रिक्षाचालकांनी तब्बल २०० रुग्णांना हॉस्पिटलला पोहचवलं

आयएसआय अधिकारी नितीन सागवान यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  या जाहिरातीमुळे अनेकांना हसू आलं आहे. पण आजंही लग्नाबाबत लोक अशा अपेक्षा ठेवतात ही चिंतेची बाब आहे.  या जाहिरातीत  सुंदर मुलगी हवी असल्याचा उल्लेख केला  आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत.  Video: बाबो! ही असली कसली हौस,‘या’ साडीच्या दुकानातल्या गर्दीने कोरोनाच जाईल पळून

Web Title: Funny shaadi ad effluent industrialist asks for fair bride troll due to wrong spelling 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.