जमिनीवर नाही तर अंतराळात होणार युद्ध; भारताकडेही आहे 'ही' खास मिसाइल, वाचा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 09:35 PM2022-08-11T21:35:18+5:302022-08-11T21:39:04+5:30

येणाऱ्या काळात जमीन, हवा आणि पाण्यासोबतच अंतराळातही युद्ध होईल. भारतासह काही मोजक्या देशाकडे आहे खास क्षेपणास्त्र.

Future wars will take place not on land but in space; India also has 'special' missile, read details... | जमिनीवर नाही तर अंतराळात होणार युद्ध; भारताकडेही आहे 'ही' खास मिसाइल, वाचा डिटेल्स...

जमिनीवर नाही तर अंतराळात होणार युद्ध; भारताकडेही आहे 'ही' खास मिसाइल, वाचा डिटेल्स...

Next

चीन आणि तैवानमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. तिकडे रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. सध्या जमीन, पाणी आणि आकाशात युद्ध होत आहेत. पण येत्या काही वर्षांत अंतराळातही युद्ध होऊ शकते. शत्रू देशांची उपग्रह हाणून पाडण्यासाठी अनेक देश अँटी-सॅटेलाइट शस्त्रे बनवत आहेत. उपग्रह पाडून त्या देशाची दळणवळण, नेव्हिगेशन, पाळत ठेवणे यासह अनेक सुविधा बंद करण्याचा यामागे हेतू आहे.

अँटी-सॅटेलाइट शस्त्रे काय आहेत?- अँटी-सॅटेलाइट मिसाइल म्हणजे, अशी क्षेपणास्त्रे जी अतिवेगाने अवकाशात जाऊन पृथ्वीभोवती फिरणाऱ्या शत्रू देशाच्या उपग्रहाला खाली पाडतात. 1957मध्ये सोव्हिएत युनियनने जगातील पहिला उपग्रह स्पुतनिक-1 प्रक्षेपित केला होता. त्यानंतर अमेरिकेने पहिले ASAT तयार केले. हे हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र होते, ज्याचे नाव बोल्ड ओरियन ठेवण्यात आले. यानंतर सोव्हिएत सांत बसले नाहीत, त्यांनीही स्वतःचे ASAT बनवले. त्यांना को-ऑर्बिटल्स अशी नावे आहेत. ही शस्त्रे स्वत:सह शत्रूच्या उपग्रहांसह ही उपग्रह गरज पडली तर स्वतःच फुटतात आणि शत्रूचा उपग्रहही नष्ट करतात. तेव्हापासून या तंत्रज्ञानावर काम सुरू असून, यात वेगाने विकास होत आहे.

चीन आणि भारताकडेही क्षेपणास्त्र- 2007 मध्ये चीनही या शर्यतीत सामील झाला होता. त्यांनी आपला जुना हवामान उपग्रह त्यांच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने अवकाशातच उडवला. यामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा पसरला आहे. 2019 मध्ये भारताने 'मिशन शक्ती' अंतर्गत बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने आपला जुना उपग्रह पाडला होता. एप्रिल 2022 मध्ये क्षेपणास्त्रांसह उपग्रहांच्या शूटिंगवर बंदी घालणारा अमेरिका पहिला देश ठरला.

या शर्यतीत कोणते देश सामील- चार देशांनी आपले जुने उपग्रह पाडण्यासाठी आतापर्यंत क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. भारत, अमेरिका, रशिया आणि चीन यांचा यात समावेश आहेत. पण नंतर अमेरिका आणि रशियाने आपापसात निर्णय घेतला आणि ASATs नष्ट केले. यामुळे अण्वस्त्रांच्या युद्धातून आपल्याला दिलासा मिळेल. रशियाने आपला जुना उपग्रह उडवला, तेव्हा अमेरिकेने क्षेपणास्त्रांसह उडणाऱ्या उपग्रहांवर बंदी घातली. कारण त्यातून बाहेर पडणारा कचरा अवकाश स्थानकासाठी धोकादायक ठरतोय. 

भारताकडे कोणते ASAT शस्त्रे आहेत- उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रांसाठी भारताकडे पृथ्वी एअर डिफेन्स (PAD) प्रणाली आहे. त्याला प्रद्युम्न बॅलिस्टिक मिसाइल इंटरसेप्टर असेही म्हणतात. हे एक्सो-वातावरण (पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर) आणि एंडो-वातावरण (पृथ्वीच्या वातावरणाच्या आत) लक्ष्यांवर हल्ला करण्यास सक्षम आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी जुनी क्षेपणास्त्र प्रणाली अपग्रेड केली असून, त्यात नवीन घटक जोडले आहेत. याचा अर्थ सध्याच्या पॅड प्रणाली तीन-स्टेज इंटरसेप्टर क्षेपणास्त्रात अपग्रेड करण्यात आल्या आहेत. मिशन शक्तीच्या चाचणीतही याच क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आलाय.

भारतीय ASAT क्षेपणास्त्राची मारक क्षमता 2000 किमी आहे. तो 1470 ते 6126 किलोमीटर प्रति तास या वेगाने उपग्रहाकडे झेपाऊ शकतो. नंतर तो अधिक शक्तिशाली आणि प्राणघातक बनविण्यासाठी अपग्रेड होऊ शकतो. डीआरडीओने बॅलेस्टिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राद्वारे 300 किमी उंचीवरचा उपग्रह पाडला होता.

Web Title: Future wars will take place not on land but in space; India also has 'special' missile, read details...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.