Gamer earning 36 lakh : भारीच! अख्खा दिवस घरात बसून खेळतो गेम अन् पठ्ठ्या महिन्याला घेतोय ३६ लाखांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 03:29 PM2021-03-29T15:29:55+5:302021-03-29T15:42:55+5:30

Gamer earning 36 lakh : या तरूणानं काहीही न करता फक्त  गेम खेळून (Gamer earning 36 lakh) लाखो रुपये कमावले आहेत. 

Gamer earning 36 lakh : Meet the gamer who is earning 36 lakh rupees per month by live streaming in south korea | Gamer earning 36 lakh : भारीच! अख्खा दिवस घरात बसून खेळतो गेम अन् पठ्ठ्या महिन्याला घेतोय ३६ लाखांची कमाई

Gamer earning 36 lakh : भारीच! अख्खा दिवस घरात बसून खेळतो गेम अन् पठ्ठ्या महिन्याला घेतोय ३६ लाखांची कमाई

Next

गेंमिंगचा छंद असलेल्यांची आवड दिवसेंदिवस जास्त वाढताना दिसून येत आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊनदरम्यान  जे लोक कधीही गेम खेळत नव्हते. तेसुद्धा पबजी, लुडो असे गेम्स  खेळायला लागले.  किम मीन क्यू या तरूणानंही याच संधीचा फायदा  घेतला अन् गेम खेळायला सुरूवात केली. तुमचा विश्वास बसणार नाही पण या तरूणानं काहीही न करता फक्त  गेम खेळून (Gamer earning 36 lakh) लाखो रुपये कमावले आहेत. 

स्टोररूमध्ये बसून खेळतो गेम

किमला गेमिंगच्या जगतात आपलं करीअर बनवायचं आहे. तो आपल्या गेम्सचे लाईव्ह स्ट्रिमिंगसुद्धा करतो.  त्यामुळे त्याचे लाखो चाहतेसुद्धा आहेत.  हा तरूण दक्षिण कोरियातील सियोलचा रहिवासी असून आपल्या आईसोबत राहतो.  स्टोररूमला त्यानं आपल्या गेमिंग रूपमध्ये रुपांतरीत केलं आहे. याच स्टोर रूममध्ये तासनतास गेम खेळून हा मुलगा लाखो रुपये कमावतो. 

इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार  २४ वर्षांच्या किमनं यात स्टोररूममध्ये आपलं घर बनवलं आहे.  इथच बसून त्यानं ३६ लाख रूपये कमावले आहेत. त्यानं सांगितले की, जास्त पैसे खर्च करणं, वाया घालवणं मला आवडत नाही.  मी सगळे पैसै आईकडे देतो. कमीत कमी पैशात साधं जीवन जगायला मला आवडतं.

७२ लाखांपर्यंत होते कमाई

लाईव्ह स्ट्रिमिंग करत असलेल्या  दक्षिण कोरियातील या तरूणाला Broadcast Jockeys असं म्हटलं जातं.  हा तरूण कमी वयातच खूप प्रसिद्ध होत चालला आहे. सध्या किम  ७२ लाख रूपये महिन्याला कमावत आहे. या गेमिंगचे व्हिडीओ तो होम प्लॅटफॉर्म AFREECATV आणि युट्यूबवर अपलोड करतो.   टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....

किम आपल्या गेमिंगच्या वेगवेगळ्या पद्धती प्रेक्षकांसह शेअर करतो. त्याचे फॅन्सही त्याला  पैसै देतात असून  स्पॉन्सरशिपही मिळते.  युट्यूबवर त्याचे ४०००००० सबस्क्राईबर्स आहेत. Korea Communications Commission च्या मते सध्या अशा प्रकारचा कटेंट जास्त प्रमाणात पाहिला जात आहे.  आश्चर्य! विचित्र आजारामुळे उलटं झालंय या माणसाचं डोकं; ४४ वर्षांपासून उलटंच पाहतोय जग, पाहा फोटो

Web Title: Gamer earning 36 lakh : Meet the gamer who is earning 36 lakh rupees per month by live streaming in south korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.