लोकांची हाडं तोडून 'ही' गॅंग कमावत होती पैसा, पैसा कमावण्याचा अघोरी मार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 02:24 PM2019-04-17T14:24:55+5:302019-04-17T14:27:50+5:30

पोलिसांनी माहिती दिली की, ही गॅंग गरीब लोकांना आपली शिकार करत होते. या गॅंगमधील लोक लोकांची हाडे तोडून त्यांना इन्शुरन्ससाठी पाठवत होते.

This gang of Italy broken bone and earn money from insurance | लोकांची हाडं तोडून 'ही' गॅंग कमावत होती पैसा, पैसा कमावण्याचा अघोरी मार्ग!

लोकांची हाडं तोडून 'ही' गॅंग कमावत होती पैसा, पैसा कमावण्याचा अघोरी मार्ग!

Next

(Image Credit : gulfnews.com)

इटलीच्या सिसिलीमध्ये पालेरमों सिटीमध्ये ४० लोकांना अटक करण्यात आली आहे. कारण हे लोक लोकांची हाडे तोडून पैसा कमावत होते. गल्फ न्यूजनुसार, पोलिसांनी माहिती दिली की, ही गॅंग गरीब लोकांना आपली शिकार करत होते. या गॅंगमधील लोक लोकांची हाडे तोडून त्यांना इन्शुरन्ससाठी पाठवत होते.

ही लोकं गरीब लोकांची हाडे तोडून त्यांना इन्शुरन्ससाठी पाठवत असत आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातील अर्धा पैसा हे गॅंगमधील लोक घेत असत. ज्या लोकांची हाडे तोडली जात होती ते लोक एकतर नशेच्या आहारी गेलेले असायचे नाही तर मानसिक आजारी असायचे. 
ही गॅंग लोकांची हाडे तोडण्यासाठी लोखंडी सळीचा वापर करत होते. त्यांचे काही कोडवर्डही होते. जर वरच्या अंगांना तोडायचं असेल तर ते याला 'फर्स्ट फ्लोर' म्हणायचे. तर खालचे अंग तोडण्यासाठी ते 'ग्राऊंड फ्लोर' असा कोड वापरायचे.

ही गॅंग खासकरुन सिंगल मदर्सना टार्गेट करायचे. या केसमध्ये इन्शुरन्सचा पैसा अधिक मिळतो. हाडे तोडण्याआधी व्यक्तीला पेनकिलर दिली जायची. जेणेकरुन त्यांचे अवयव सुन्न होतील आणि मग हे हाडं तोडू शकतील. 

२०१७ मधील ही घटना आहे. ट्यूनीशियामधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याचं पोस्टमार्टेम झालं. त्यात आढळलं की, त्याला मारहाण झाली होती. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला ड्रग्सही देण्यात आलं होतं. अशात पोलिसांना शंका आली. त्यानंतर याचा उलगडा होत गेला आणि या गॅंगमध्ये सहभागी वकिल, खोटे साक्षीदार, डॉक्टर्स आणि खोटी बिलं तयार करणारे लोक यांचाही समावेश होता. 

Web Title: This gang of Italy broken bone and earn money from insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.