जेंडर चेंज करून महिला बनली पुरूष, मग असं काय झालं की पुन्हा बनली महिला?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:09 PM2022-05-11T12:09:21+5:302022-05-11T12:09:46+5:30
Gender Change : आलियाने सांगितलं की, जेव्हा ती गे असल्याची बाब समोर आली तेव्हा परिवाराने तिला खूप साथ दिली. सर्वांनी तिच्या निर्णयाला पूर्णपणे सपोर्ट केला.
Why She Became A Female Again: २७ वर्षीय आलिया इस्माइलला पुरूष बनून आपली ओळख गमावल्याची जाणीव झाली. १८ वर्षांची असतानापासूनच आलियाला तिच्या बॉडीबाबत काहीतरी गडबड वाटत होती. त्यामुळे काही वर्षांनी तिने आपला जेंडर बदलण्याचा निर्णय घेतला आणि २० वर्षांची असताना तिने जेंडर बदललं.
जेंडर चेंज करण्याच्या प्रोसेसमध्ये मेल हार्मोन्स टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढवलं जातं. 'टाइम्स नाउ' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, आलियाने आपल्या जेंडर चेन्जसोबतच आपलं नावही बदलून इसा ठेवलं होतं. पण काळानुसार तिला जाणीव झाली की, मेल म्हणजेच पुरूष बनून तिला काही खास आयडेंटिटी मिळाली नाही आणि मग पुन्हा तिने आपला जेंडर बदलला.
आलियाने सांगितलं की, जेव्हा ती गे असल्याची बाब समोर आली तेव्हा परिवाराने तिला खूप साथ दिली. सर्वांनी तिच्या निर्णयाला पूर्णपणे सपोर्ट केला आणि तिच्या भावना समजून घेतल्या. पण मेल बनल्यानंतर जेव्हा आलियाला तिने विचार केला तशी ओळख मिळाली नाही तेव्हा तिने मेल हार्मोन्स घेणं बंद केलं. तेव्हा तिचं एस्ट्रोजन लेव्हल समान होती आणि टेस्टोस्टेरॉन कमी होऊ लागले होते.
आलियाला तिच्या कोणत्याही निर्णयावर कोणताही पश्चाताप नाही. ती सांगते की, तिला गर्व आहे की, तिने स्वत:चा शोध घेण्याची हिंमत दाखवली आणि एका नव्या लाइफला एक्सप्लोर केलं. आलिया नेहमीच तिच्या जेंडर चेन्जच्या निर्णयाबाबत बोलत राहिली आहे. जेणेकरून दुसरे लोक तिच्या अनुभवातून काही शिकू शकतील.