General Knowledge: कुठल्याही गाडीचे टायर काळेच का असतात? खास आहे कारण, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 04:43 PM2022-10-25T16:43:13+5:302022-10-25T16:45:25+5:30
जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, तर जाणून घ्या, या मागचे खास कारण...
आपण रस्त्यावरून चालताना ट्रक, कार, बाइक्ससह आदी सर्वच प्रकारची वाहने बघितली असतील. पण या सर्वच वाहनांचे टायर्स नेहमी काळेच का असतात? असा प्रश्न कधी आपल्याला पडला आहे का? जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, तर जाणून घ्या, या मागचे वैज्ञानिक कारण...
आपल्याला माहितच असेल, की वाहनांचे टायर्स रबराचे असतात. रबराचा रंग राखाडी असला तरी टायर बनवण्याच्या प्रक्रियेत त्याचा रंग काळा होतो. काळे टायर अधिक काळ टिकतात, यामुळे टायरचा रंग काळा असतो. खरे तर, टायर बनविण्यासाठी रबरमध्ये ब्लॅक कार्बन आणि सल्फर मिसळले जाते. यामुळे टायरचा रंग काळा होतो.
नैसर्गिक रबर अत्यंत मऊ असते. पण टायर बनविण्यासाठी ते कडक केले जाते. रबर कडक करण्यासाठीच त्यात कार्बन आणि सल्फर मिसळले जाते. यामुळेच टायरचा रंग काळा असतो. जर रबरात कार्बन आणि सल्फर मिसळले नाही, तर यापासून तयार होणारे टायर अत्यंत खराब क्वालिटीचे असतील. तसेच कमी वापरातच हे टायर घासले जातील आणि खराब होतील. यामुळे वाहनांचे टायर्स काळ्या रंगाचे असतात.