Video : नेमकं स्फोटावेळी जन्माला आलंं हे बाळ, व्हिडीओ पाहून लोक म्हणू लागले - George The Miracle!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:18 PM2020-08-22T12:18:02+5:302020-08-22T12:29:28+5:30
ज्यावेळी स्फोट झाला होता त्याचवेळी जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा जन्म झाला होता. स्फोटामुळे हॉस्पिटलचं छत आणि भींती तुटल्या होत्या. तेव्हाच जॉर्जचा जन्म झाला.
काही आठवड्यांपूर्वीच लेबनानची राजधानी बेरूतमध्ये स्फोट झाला होता. सर्वांनाच चटका लावून जाणाऱ्या या घटनेत १७० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता. तर ६ हजारपेक्षा जास्त लोक जखमी झाले. हा स्फोट इतका भयंकर होता की, बेरूत शहराला याने उद्ध्वस्त करून सोडलंय. ज्यावेळी स्फोट झाला होता त्याचवेळी जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा जन्म झाला होता. स्फोटामुळे हॉस्पिटलचं छत आणि भींती तुटल्या होत्या. तेव्हाच जॉर्जचा जन्म झाला.
miraclebabygeorge नावाने इन्स्टावर एक पेजही तयार करण्यात आलंय. यावरील व्हिडीओत तुम्ही तो क्षण पाहू शकता जेव्हा जॉर्जच्या आईला प्रसुती कळा येत होत्या. तेव्हा एक छोटा धमाका झाला हॉस्पिटलमधील काच फुटली. त्यानंतर काही वेळातच मोठा धमाका झाला. जॉर्जची आई इम्मानुएल लतीफने सांगितले की, 'मी त्यादिवशी मृत्यूला माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मला असं वाटलं होतं की, आता सगळं काही संपलं. मी सतत छताकडे बघत होते आणि विचार करत होते की, कोणत्याही क्षणी ते माझ्यावर पडेल. मला काय करावं हे कळत नव्हतं. मी विचार केला की, जॉर्ज या जगात यायला पाहिजे. त्यासाठी मला मजबूत व्हायचं आहे. मला तुटायचं नाहीये'.
या धमाक्यात जॉर्जचे वडील एडमंडची आई फार गंभीरपणे जखमी झाली होती. एडमंड कधी आईकडे जायचे तर कधी पत्नीकडे जायचे. जॉर्जचा जन्म होताच त्याला आंघोळ न घालताच तसंच बाहेर आणण्यात आलं. एका कारवाल्याला लिफ्ट मागितली गेली. थोड्याच वेळात आई आणि बाळ बेरूतबाहेरील हॉस्पिटलमध्ये सुरक्षित ठिकाणी पोहचले.
आता सोशल मीडियावर जॉर्जला लोक अंधारात प्रकाशाचं प्रतीक मानत आहे. इतकेच काय तर लोक त्याला 'चमत्कारी बाळ'ही मानत आहेत. जॉर्ज पूर्णपणे निरोगी असून तो लोकांसाठी आता हिरो ठरत आहे. त्याच्या पेजला इन्स्टावर १५०० पेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
२७५० टन अमोनियम नायट्रेटच्या झालेल्या स्फोटाने लेबनानची राजधानी बैरूत हादरली. बेरूतचे बंदर आणि परिसर पूर्णपणे उद्धवस्त झाले असून अंगावर काटा येणारे भयावह दृष्य समोर आले आहे. बंदर परिसरात मृतदेहांचा खच पडला आहे. सगळीकडे उद्धवस्त झालेल्या इमारती, मातीचा ढिग, स्फोटामुळे चक्काचूर झालेल्या कार व इतर वाहने असे सगळे भयावह दृष्य समोर आले आहे.
हे पण वाचा:
कोरोना झालेल्या व्यक्तीचं हॉस्पिटलमध्येच लावून दिलं लग्न, व्हिडीओ व्हायरल
'हे' गाणं ऐकल्यानंतर अनेकांनी केल्या होत्या आत्महत्या, तब्बल 62 वर्षे घालण्यात आली होती बंदी!
नशीबच! 18व्या मजल्यावरून पडला 4 वर्षांचा चिमुकला; पण, "देव तारी त्याला कोण मारी!"