ऐकावं ते नवलच...दोरीवरुन जाणाऱ्या मोटरसायकलला लोंबकळत केला विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 12:02 PM2018-06-20T12:02:11+5:302018-06-20T12:02:11+5:30
मोटरसायकलला बांधण्यात आलेल्या पाळण्यामध्ये वधू वर बसले होते.
बर्लिन- आपलं लग्न कायम सर्वांच्या स्मरणात राहावं म्हणून चित्रविचित्र प्रयोग जगभरात केले जातात. सामान्य माणसं चांगले कपडे, थोडासा मेकअप करुन नेहमीपेक्षा "थोडे" अधिक चांगले दिसण्याचा प्रयत्न करतात. काही लोक डाएट, व्यायाम करुन वजन वाढवतात किंवा कमी करतात. पण आजकाल काही विचित्र प्रयोग करण्याचीही लाट जगभरात आली आहे. व्हॅली क्रॉसिंग करुन दोन दऱ्यांच्यामध्ये झालेले शुभमंगल, विमानात झालेले लग्न अशा बातम्या आपण वाचल्या असतीलच पण एका जर्मन जोडीने यापुढे जाऊन नवा विक्रम केला आहे.
High and In Love:
— A&E Today (@ceoaetnews) June 19, 2018
German couple married in tightrope #wedding : #TuesdayTruth#TuesdayTravel#TuesdayThoughtshttps://t.co/RwC48YgFeZpic.twitter.com/Jv44DSsagu
या दोघांनी जमिनीपासून 65 फूट उंचीवर एका दोरीवर लोंबकळून विवाह केला आहे. या दोरीवरुन मोटरसायकल चालविण्यात आली आणि तिच्या चाकाखाली एक पाळणा बांधण्यात आला. त्यामध्ये हे वधूवर होते. जर्मनीमधील स्ट्रॅसफर्ट येथे निकोल बॅकहॉस व जेन्स नॉर हे अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने विवाहबद्ध झाले. हे सगळे पाहाण्यासाठी 3000 लोकही तेथे गोळा झाले होते. ही दोरी टाऊन हॉल आणि एका टॉवरच्यामध्ये बांधण्यात आला होता. तर त्यावर मोटरसायकल चालवण्याचे अत्यंत कठिण काम फाल्को ट्रॅबर यांनी केले.
More than 3,000 people watched this couple get married in a swing, hanging from a motorcycle on a tightropehttps://t.co/c0gdLR213z
— CBS 21 News (@CBS21NEWS) June 16, 2018