...म्हणून 'या' देशातील डॉक्टरांना विवस्र होऊन करावा लागला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:29 PM2020-04-28T15:29:54+5:302020-04-28T15:41:40+5:30

एका वयस्कर डॉक्टरने फक्त गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून विवस्त्र होऊन रुग्णालयात आपला फोटो काढला आहे.  

German doctors pose naked protesting shortages of personal protective equipment pics goes viral myb | ...म्हणून 'या' देशातील डॉक्टरांना विवस्र होऊन करावा लागला निषेध

...म्हणून 'या' देशातील डॉक्टरांना विवस्र होऊन करावा लागला निषेध

Next

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे.  कोरोना व्हायरसचा धोका इतका वाढला आहे की रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, आरोग्य विभागात कार्यरत असलेले कर्मचारी तसंच पोलिसांना सुद्धा कोरोनाचं शिकार व्हावं लागत आहे. या सगळ्यात अत्यावश्यक सेवेतील कर्माचारी वर्गाला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आपले प्राण गमवावे लागत आहे. फक्त भारतातच नाही युरोपातील अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ही समस्या उद्भवत आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गाकडे पीपीई म्हणजेच पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट नाही. पीपीईची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत जर्मनीतील डॉक्टरांनी आपली नाराजी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी विवस्त्र होऊन आपले फोटो काढले आहेत. इतकंच नाही तर हे फोटो सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केले आहेत.

बील्ड यांनी आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या माध्यामातून त्यांना जगभरातील लोकांना दाखवून द्यायचं आहे. पीपीई किट नसताना सुद्धा ते स्वतःची  काळजी घेत आहेत. डॉक्टर रुबेन यांनी सांगितलं की विवस्त्र होण्यामागे आम्हाला असा संदेश द्यायचा आहे की, आम्ही सुरक्षेशिवाय शिवाय काम करत आहोत. सध्या आम्ही आमच्या प्रॅक्टिस टीमसोबत  सुरक्षेचा अभाव असताना सुद्धा काम करत आहोत.

तर या फोटोमधील एका वयस्कर डॉक्टरने फक्त गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून विवस्त्र होऊन रुग्णालयात आपला फोटो काढला आहे.  जर्मनीमध्ये सुरक्षेसाठी वापरात असलेल्या अनेक गोष्टींची कमतरता आहे. डॉक्टरांना ग्लॉव्हज ,मास्क, चश्मा यांसारख्या मूलभूत गोष्टींसुद्धा पुरवलेल्या नाहीत. ( हे पण वाचा-'या' औषधाने फक्त २ दिवसात मरेल कोरोनाचा विषाणू; तज्ज्ञांचा दावा)

माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक रुग्णालयांमध्ये सुरक्षा किटची चोरी करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील सिक्यूरिटी वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत जर्मनीमध्ये लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ( हे पण वाचा-कोरोनाचा किडनीवर 'असा' होत आहे गंभीर परिणाम; डायलिसिस मशिनची कमतरता)

Web Title: German doctors pose naked protesting shortages of personal protective equipment pics goes viral myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.