२७ वर्षाने मोठ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली विद्यार्थिनी, यूट्यूबवर व्हिडीओ पाहून झाली होती फिदा....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 01:45 PM2021-01-14T13:45:18+5:302021-01-14T13:45:42+5:30
२१ वर्षीय सायकॉलॉजी विद्यार्थिनी जेना कधीही विचार नव्हता केला की, यूट्यूबच्या माध्यमातून तिचं रिलेशनशिप सुरू होईल.
जर्मनीतील एक सायकॉलॉजीची विद्यार्थिनीने यूट्यूबवर एका फिलॉसॉफीच्या शिक्षकाला बघितल्यावर त्याला संपर्क केला आणि काही महिन्यातच दोघांचं रिलेशनशिप सुरू झालं. या दोघांमध्ये २७ वर्षांचं अंतर आहे ज्यामुळे या कपलचं नातं परिवारातील लोकांसोबत बिघडलं आहे.
२१ वर्षीय सायकॉलॉजी विद्यार्थिनी जेना कधीही विचार नव्हता केला की, यूट्यूबच्या माध्यमातून तिचं रिलेशनशिप सुरू होईल. जेना जेव्हा १८ वर्षांची होती तेव्हा फिलॉसॉफीचे शिक्षक पीटर हेनरिच यांचा एक व्हिडीओ पाहिला होता आणि त्यानंतर दोघांमध्ये ईमेल चॅट सुरू झालं. साधारण तीन महिन्यांनंतर दोघे २०१७ मध्ये पहिल्यांदा भेटले होते. दोघांनाही पहिल्या नजरेत एकमेकांवर प्रेम झालं होतं.
जेनाने याबाबत सांगितले की, मी यूनिव्हर्सिटीमध्ये फिलॉसॉफी किंवा सायकॉलॉजी शिकण्याचा प्रयत्न करत होते. कारण हे दोन्ही विषय मला आवडतात. यामुळे मी रिकाम्या वेळेत या विषयांवरील यूट्यूब व्हिडीओज बघत असे. काही वर्षांपूर्वी असाच एक व्हिडीओ मी पाहिला होता. यातील शिक्षकावर मी फार इम्प्रेस झाले होते. त्यांचा आवाज आणि त्यांचा अंदाज मला फार आवडला होता. त्यानंतर मी त्यांना एक ई-मेल लिहिला.
आता या नात्यामुळे जेना आणि पीटरला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जेना याबाबत म्हणाली की, वयात फार अंतर असल्याने तिला फार विरोध झाला. पण लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की, तुम्ही कसे आनंदी राहू शकता. शेवटी तिच गोष्ट महत्वाची असते आणि प्रेमात वयाला बंधन नसतं.
जेना आणि पीटर एकमेकांपासून फार दूर राहतात. दोघे सध्या लॉंग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये आहेत. जेना सांगते की, तिचं पीटरसोबत भांडण होत नाही. कारण ते प्रत्येक गोष्टीची चर्चा करतात. जेना हेही सांगते की, तिची पीटरसोबती केमिस्ट्री कमाल आहे. हेच कारण आहे की, ती समाजाची परवा न करता आपल्या मनाचं ऐकते.