काय सांगता! 'या' यूनिव्हर्सिटीत रिकामं बसायचे मिळतात १.४१ लाख रूपये, तुमचं लक्ष आहे तरी कुठं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 02:33 PM2020-08-24T14:33:58+5:302020-08-24T14:49:51+5:30
जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, एका यूनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला काहीच न करण्याचे १.४१ लाख रूपये मिळवण्याची संधी आहे.
काही लोक असे असतात ज्यांना वाटत असतं की, त्यांना कोणतंही काम कराव लागू नये आणि तरी त्यांच्या अकाऊंटमध्ये लाखो रूपये जमा होत जावे. प्रत्येक दिवस रविवार असावा अशी त्यांची इच्छा असते. पण या सर्व स्वप्नवत गोष्टी आहेत आणि सोमवार हा सत्य आहे. अशात जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, एका यूनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला काहीच न करण्याचे १.४१ लाख रूपये मिळवण्याची संधी आहे.
जर्मनीच्या एका यूनिव्हर्सिटीने ही ऑफर दिली आहे. 'द गार्डियन'च्या रिपोर्टनुसार, जर्मनी हॅमबर्गच्या यूनिव्हर्सिटी ऑफ फाइन आर्ट्सने Idleness Grant देण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत हे होईल की, यूनिव्हर्सिटी कोणतंही काम न करता केवळ बसून राहण्यासाठी तुम्हाला १,६०० यूरो देईल. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १.४१ लाख रूपये इतकी होते.
यूनिव्हर्सिटी अॅप्लीकेशन फॉर्ममध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जातील. जसे की, तुम्हाला काय करायचं नाहीये? तुम्हाला का वाटतं की, कोणतंही काम करू नये?. हा एकप्रकारचा एक रिसर्च आहे. हा रिसर्च थेअरीस्ट फ्रेडरिक वॉन बोरिसने तयार केला आहे. ही संपूर्ण संकल्पना त्यांची आहे. फ्रेडरिक यांचं मत आहे की, याचा उद्देश हे समजून घेणं आहे की, कशाप्रकारची स्थिरता आणि उच्च प्रशंसा एकाच ठिकाणी असू शकते.
फ्रेडरिक म्हणाले की, 'आम्हाला सक्रिय निष्क्रियतेवर फोकस करायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, एक आठवडा तुम्हाला तुमच्या जागेवरून हलायचं नाहीये. तर ही एक इंप्रेसिव्ह बाब आहे. जर तुम्हाला जागेवरून हलायचंही नसेल आणि विचारही करायचा नसेल तर ही बाब शानदार आहे'. यूनिव्हर्सिटीने सांगितले की, या प्रोजेक्टसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकता जानेवारी २०२१ पर्यत जर कुणी टेस्ट क्वालिफाय केली तर तुम्हाला रक्कम दिली जाईल.
हे पण वाचा :
या फोटोत दडलेल्या ब्रॅण्ड्सची संख्या किती? शोधून शोधून थकाल; बघा जमतंय का हे चॅलेन्ज
बाबो! खोदकामात मजुराला सापडला ४४२ कॅरेटचा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्...
महात्मा गांधीजींच्या चष्म्याची २.५५ कोटींना विक्री; नवीन मालक अमेरिकन