कायच्या काय! घरात झुरळं पाळा अन् लाखो रुपये कमवा, कंपनीची अजब ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 08:26 PM2022-06-16T20:26:13+5:302022-06-16T20:30:02+5:30
झुरळांचा नायनाट करण्यासाठी काय काय उपाय करतो. पण नकोशी वाटणारी हीच झुरळं घरात ठेवण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये मिळत असतील तर... तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एका कंपनीने तशी ऑफर दिली आहे.
घरात झुरळ असणं कुणालाच आवडणार नाही. घरात झुरळं असणं म्हणजे अस्वच्छता, दुर्गंधीचं संकेत. त्यामुळे एक जरी झुरळ दिसलं तरी त्याची आपण पाठ सोडत नाही. झुरळांचा नायनाट करण्यासाठी काय काय उपाय करतो. पण नकोशी वाटणारी हीच झुरळं घरात ठेवण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये मिळत असतील तर... तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एका कंपनीने तशी ऑफर दिली आहे. घरात झुरळं पाळण्यासाठी ही कंपनी घरमालकाला चक्क दीड लाख रुपये देत आहे.
अमेरिकेतील एका पेस्ट मॅनेजमेन्ट कंपनीनेही ही ऑफर दिली आहे (American Company Research on Cockroaches). ही कंपनी उत्तर कॅरोलिनाकत आहे. या कंपनीला कॉकरोच नष्ट करणाऱ्या एका औषधावर अभ्यास करायचा आहे. कंपनीने तयार केलेलं औषध कॉकरोचवर किती प्रभावी ठरत आहे, हे कंपनीला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी कंपनीने आपल्या वेबसाईटवर पोस्ट करत जे लोक आपल्या घरात कॉकरोज ठेवण्याची परवानगी देतील त्यांना पैसे दिले जातील असं म्हटलं आहे.
ही कंपनी घरात जवळपास 100 कॉकरोच सोडेल. यासाठी त्या घराच्या मालकाला 2,000 डॉलर्स म्हणजे जवळपास दीड लाख रुपये देईल. कंपनीला अशी 5-6 घरं हवी आहेत. कंपनीची ही चाचणी जवळपास एक महिना सुरू राहिल. कॉकरोच हटवण्यासाठी कंपनीने पेस्ट कंट्रोल प्रोफेशनल्सना पाठवेल.
रिपोर्टनुसार यासाठी कंपनीने काही अटीही ठेवल्या आहेत. घर अमेरिकेत असायला हवं. घरमालकाचं वय कमीत कमी 21 वर्षे असायला हवं आणि घरमालकाने या टेस्टसाठी आपली लिखित परवानगी द्यायला हवी. 30 दिवसांच्या कालावधीत घरमालाका कोणत्याही इतर पेस्ट कंट्रोलचा वापर करण्याची परवानगी नसेल. जर 30 दिवसांत कंपनी नव्या पद्धतीने झुरळांचा नायनाट करू शकली नाही तर इतर पर्यायांनी ती झुरळांचा नाश करेल.
ही ऑफर फक्त अमेरिकेत घर असलेल्यांसाठी मर्यादित असली तरी जर तुम्हालाही अशी ऑफर मिळाली तर तुम्हाला तुमच्या घरात झुरळं ठेवायला आवडेल की नाही, तुम्ही यासाठी तयार आहात की नाही हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.