लोकांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी शक्कल, बुद्धिबळाने व्यसनाला केले चेकमेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:27 AM2017-08-28T02:27:59+5:302017-08-28T02:28:37+5:30
केरळातील त्रिशूर जिल्ह्यातील मारोत्तीचाल या गावात कधीकाळी रस्त्यावरून जाण्याचीही हिंमत कोणी करत नव्हते. विशेषत: सायंकाळी सातनंतर तर परिस्थिती अधिकच बिकट होत होती.
केरळातील त्रिशूर जिल्ह्यातील मारोत्तीचाल या गावात कधीकाळी रस्त्यावरून जाण्याचीही हिंमत कोणी करत नव्हते. विशेषत: सायंकाळी सातनंतर तर परिस्थिती अधिकच बिकट होत होती. मद्यासह अनेक व्यसनांमुळे येथे कलह वाढले होते. गावातील सी. उन्नीकृष्णन यांनी लोकांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. पाहता-पाहता अनेक जण या खेळात गुंग झाले. आज अशी परिस्थिती आहे की, सायंकाळी सातनंतर प्रत्येक गल्लीत, घराच्या अंगणात लोक बुद्धिबळ खेळताना दिसतात. या गावातील प्रत्येक घरातील एक सदस्य बुद्धिबळ खेळताना दिसेल. उन्नीकृष्णन सांगतात की, हे काम आव्हानात्मक होते, पण मेहनतीला अखेर फळ मिळाले. तत्कालिन ग्रँडमास्टर बॉबी फिशर यांचा आपल्यावर प्रभाव असल्याचे ते सांगतात. या गावातील १००० लोकांनी एकाच वेळी बुद्धिबळ खेळून एशियन रेकॉर्डही केला आहे. गावातील मुलातून स्टेट आणि नॅशनल चॅम्पियन तयार करणे, हे उन्नीकृष्णन यांचे स्वप्न आहे.