जमिनीच्या 600 फूट खाली सापडली प्राचीन झाडे, फोटो बघून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 12:42 PM2023-08-23T12:42:16+5:302023-08-23T12:44:14+5:30
इथे एक असा सिंकहोल म्हणजे खड्डा सापडला आहे जो 600 फूट खोल आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या खड्ड्यात एक वेगळंच विश्व तयार झालं आहे.
जगात अनेक अशी ठिकाणं आहेत जी बघून हैराण व्हायला होतं. काही तर अशीही ठिकाणं आहेत ज्याबाबत मनुष्यांना पूर्ण माहिती नाही. ही ठिकाणं निसर्गाचा करिश्मा असतात. असाच एक करिश्मा चीनमध्ये बघण्यात आला. इथे एक असा सिंकहोल म्हणजे खड्डा सापडला आहे जो 600 फूट खोल आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या खड्ड्यात एक वेगळंच विश्व तयार झालं आहे.
डेली मेल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये एका 630 फूट खोल खड्ड्यात एका विशाल प्राचीन जंगलाचा शोध लावण्यात आला आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात वैज्ञानिकांच्या एका टीमला हा खड्डा दिसून आला होता. ‘जियोपार्क’ मध्ये हा खड्डा आढळून आला.
अभ्यासक म्हणाले की, हे प्राचीन जंगल आधीपासून अज्ञात झाडे आणि प्राण्यांचं घर असावं. याआधीही चीनच्या जंगलात असे विशाल सिंकहोल सापडले आहेत. एका रिपोर्टनुसार देशात असे 30 सिंकहोल आहेत.
चायना जियोलॉजिकल सर्वेच्या इंस्टीट्यूट ऑफ कार्स्ट जियोलॉजीचे वरिष्ठ इंजीनिअर झांग युआनहाई यांनी सांगितलं की, खाली एक चांगलं संरक्षित प्राचीन जंगल आहे आणि इथे काही गुहाही आहेत. सिंकहोलची लांबी 306 मीटर, रूंदी 150 मीटर आणि खोली 192 मीटर आहे.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, प्राचीन झाडं सिंकहोलमधून उगवत आहेत. ते साधारण 40 फूट उंच आहेत. खाळी आढळलेलं जंगल असामान्य आहे. जे एखाद्या काल्पनिक सिनेमासारखं दिसतं.