चमत्कार! लेकीने आईची हाक ऐकली; मृत्यूच्या 12 तासांनंतर अचानक जिवंत झाली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 06:47 PM2022-08-24T18:47:11+5:302022-08-24T18:47:57+5:30

मृत्यूच्या 12 तासांनंतर एक चिमुकली अचानक जिवंत झाली आणि सर्वांनाच धक्का बसला आहे.

Girl, 3, wakes up at own funeral after doctors said she was dead from stomach bug | चमत्कार! लेकीने आईची हाक ऐकली; मृत्यूच्या 12 तासांनंतर अचानक जिवंत झाली अन्...

चमत्कार! लेकीने आईची हाक ऐकली; मृत्यूच्या 12 तासांनंतर अचानक जिवंत झाली अन्...

Next

आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला की सर्वांनाच ती व्यक्ती परत यावी असं वाटत असतं. काही तरी चमत्कार व्हावा अशी आशा असते. अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. मृत्यूच्या 12 तासांनंतर एक चिमुकली अचानक जिवंत झाली आणि सर्वांनाच धक्का बसला आहे. मेक्सिकोमध्ये ही घटना घडली. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

सॅन लुइस पोटोसील राहणारी 3 वर्षांची कॅमिलिया रोक्साना, हिच्या पोटात इन्फेक्शन झालं होतं. तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केले पण तिला वाचवता आलं नाही. उपचारावेळी तिचं हृदय बंद प़डलं आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पण तब्बल 12 तासांनी चमत्कार झाला. आपल्या मुलीचा मृत्यू झाला, यावर तिच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. माझी मुलगी जिवंत आहे, तिचा मृत्यू झाला नाही, असं ती सर्वांना ओरडून ओरडून सांगत होती. 

मुलीवर अंत्यसंस्काराची वेळ आली. पण तरी आपली मुलगी जिवंत आहे, हा विश्वास तिच्या आईला होता. तिचं शवपेटीकडे लक्ष होतं. अचानक तिला शवपेटी हलताना दिली. तेव्हाही तिने सर्वांना याबाबत सांगितलं. पण तेव्हासुद्धा कुणीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही. तिला भास झाला असावा असं सर्वांनी तिला सांगितलं. 

काही वेळाने शवपेटीतून आवाज येऊ लागला. मुलगी आतमध्ये रडत होती आणि आपल्या आईला आवाज देत होती. तेव्हा शवपेटी उघडली आणि पाहतो तर काय मुलगी चक्क जिवंत होती. मृत घोषित केल्यानंतर तब्बल 12 तासांनी मुलगी पुन्हा जिवंत झाली. लोक याला चमत्कार मानत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Girl, 3, wakes up at own funeral after doctors said she was dead from stomach bug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.