१६ वर्षानंतर ती भरपेट जेवली, त्या आधी जिवंत होती फक्त 'या' दोन पदार्थांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 06:33 PM2021-12-27T18:33:38+5:302021-12-27T18:36:32+5:30

खाणं नियंत्रित करून वजनावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालं आहे. मात्र जर एखाद्याला खाणंच नकोसं वाटत असेल, खाण्याचा त्रास होत असेल, तर त्याचं काय करायचं? एका तरुणीला नेमकी हीच समस्या तब्बल १६ वर्षं भेडसावत आहे. 

girl ate meal after 16 years was surviving on bread and cheese | १६ वर्षानंतर ती भरपेट जेवली, त्या आधी जिवंत होती फक्त 'या' दोन पदार्थांवर

१६ वर्षानंतर ती भरपेट जेवली, त्या आधी जिवंत होती फक्त 'या' दोन पदार्थांवर

googlenewsNext

एका तरुणीनं (Young girl) जन्मानंतर थेट वयाच्या सोळाव्या वर्षीच (At the age of 16) जेवण (Meal) केल्याची एक घटना सध्या जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांचं वजन आणि ते घेत असलेला आहार यांचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे वजन कमी करणे किंवा वाढवणे या दोन्ही बाबींसाठी खाण्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात येतं. खाणं नियंत्रित करून वजनावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालं आहे. मात्र जर एखाद्याला खाणंच नकोसं वाटत असेल, खाण्याचा त्रास होत असेल, तर त्याचं काय करायचं? एका तरुणीला नेमकी हीच समस्या तब्बल १६ वर्षं भेडसावत आहे. 

ग्रेसी रॉड नावाच्या एका मुलीला ती केवळ दीड वर्षांची असताना एक आजार जडला होता. त्यात तिची खाण्यावरची वासना पूर्णतः उडाली आणि परत आलीच नाही. त्यामुळे ग्रेसी सामान्य मुलांप्रमाणे अन्नच खात नसे. तिला रोजच्या जेवणात केवळ चीज स्प्रेड आणि ब्रेड एवढाच मेन्यू असायचा. घरात एखादा कार्यक्रम असेल आणि बरेच पाहुणे येणार असतील तरी ग्रेसीसाठी मात्र ब्रेड आणि स्प्रेड चीज हे दोनच पदार्थ तयार केले जात आणि तिला खाऊ घातले जात.

ग्रेसीला जेव्हा चीज आणि ब्रेड याव्यतिक्त इतर पदार्थ दिले जात, तेव्हा तिचं मानसिक स्वास्थ्य बिघढत असे. ते ठिक करण्यासाठी तिला पुन्हा स्प्रेड चिज आणि ब्रेडच द्यावा लागे. त्यामुळे दीड वर्षांची असल्यापासून ते वयाची सोळा वर्षं होईपर्यंत ती केवळ आणि केवळ याच दोन पदार्थांवर जगत होती. 

ग्रेसीला असणाऱ्या अन्नाच्या ऍलर्जीवर तिला मानसोपचार देण्यात आले आणि जेवण करायला ती तयार झाली. नुकतंच तिने पुडिंग्ज, रोस्टिंग्ज आणि गाजर असं भरपेट जेवण केलं. हे जेवण तिने पचवलं असून हळूहळू तिची अन्नाबाबतची मतं बदलत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Web Title: girl ate meal after 16 years was surviving on bread and cheese

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.