स्पर्म डोनेशनमधून जन्माला आलेल्या तरूणीचे शोधले तिचे ६० भाऊ--बहीण, रिअल 'विक्की डोनर' आहे वडील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 01:45 PM2021-06-04T13:45:16+5:302021-06-04T13:54:01+5:30
२३ वर्षीय कियानीने मिररला सांगितले की, 'मी इतर मुलांना त्यांच्या आई-वडिलांसोबत बघितलं आणि विचार केला की, माझ्यासोबत असं काही नाही? मी चार वर्षांची असताना हा प्रश्न विचारला होता'.
सायन्सच्या प्रगतीमुळे माणसाच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. सायन्समुळे स्पर्म डोनेशनसाऱखी टेक्नीक समोर आली. ज्याद्वारे प्रेग्नेन्सीत अडचणी असणाऱ्यांना अपत्य प्राप्ती करता येते २३ वर्षीय कियानीचा जन्म याच टेक्नीक म्हणजे स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून झाला होता. कियानी मोठी झाली तर तिला समजलं की, तिच्या परिवारातील लोक एकमेकांसारखे दिसत नाहीत. कियानीला दोन आई होत्या. लेस्बियन परिवारात जन्माला आलेली २३ वर्षीय कियानीने मिररला सांगितले की, 'मी इतर मुलांना त्यांच्या आई-वडिलांसोबत बघितलं आणि विचार केला की, माझ्यासोबत असं काही नाही? मी चार वर्षांची असताना हा प्रश्न विचारला होता'.
आईने सांगितली होती कथा
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारी कियानीने पुढे सांगितले की, 'माझ्या आईने सांगितलं होतं की, तिला लहान मूल हवं होतं. त्यामुळे ती मदतीसाठी डॉक्टरकडे गेली. त्यानंतर त्यांनी एक विशेष स्पर्म आईच्या पोटात टाकलं'. कियानी जसजशी मोठी होत गेली तेव्हा गोष्टी समजू लागल्या होत्या आणि तिला समजलं की आईने स्पर्म डोनरच्या मदतीने तिला जन्म दिला. ती नेहमी तिच्या बालपणाबाबत विचार करत होती. ती नेहमीच विचार करायची की, तिचे वडील कोण आहेत. (हे पण वाचा : डॉक्टरने न सांगता केला स्वत:च्या स्पर्मचा वापर, ४० वर्षांनी महिलेकडून नुकसान भरपाईची मागणी)
असा घेतला वडिलांचा शोध
कियानी फादर्स डे ला कार्ड बनवत होती. पण तिच्याकडे ते देण्यासाठी वडील नव्हते. एक दिवस कियानीने ठरवलं की, एके दिवशी ती तिच्या वडिलांचा शोध घेणार. कियानीने सांगितले की, स्पर्म डोनेट करणाऱ्याची प्रोफाइल खाजगी होती. म्हणजे याचा अर्थ असा होता की, मूल स्पर्म डोनेट करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती मिळवू शकत नव्हतं. पण डोनर कंपनीच्या प्रोमोशनल व्हिडीओमध्ये कियानीच्या वडिलांनी आपलं मन बदलून सगळं सार्वजनिक केलं. म्हणजे त्याने सार्वजनिक केलं होतं. ते कुणीही बघू शकत होतं. म्हणजे कियानी तिच्या वडिलांना संपर्क करू शकत होती.
६० भाऊ-बहिणींची मिळाली माहिती
वडिलांची माहिती मिळाल्यावर कियानीने आपल्या भाऊ-बहिणींचा शोध घेणं सुरू केलं होतं आणि स्पर्म डोनेशनमधून जन्माला आलेल्या मुलांना शोधण्यासाठी तिने दिवसरात्र एक केली. आपल्या मिशनच्या माध्यमातून कियानीने आतापर्यंत तिच्या ६० भाऊ-बहिणींचा शोध घेतला आहे. काहींसोबत तर ती भेटली सुद्धा. काही भाऊ-बहीण कॅनडा, न्यूझीलॅंड आणि ऑस्ट्रेलियात राहतात. अमेरिकेच्या फ्लोरिडातच तिचे १२ भाऊ-बहीण राहतात. त्यांना ती नेहमीच भेटते. कियानी अजूनही आपल्या भाऊ-बहिणींचा शोध घेत आहे.