तरूणाने तरूणीला केलं एचआयव्ही पॉझिटिव्ह, एका वर्षानंतर पुन्हा भेटला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:23 PM2022-05-18T12:23:53+5:302022-05-18T12:24:31+5:30
महिलेने सांगितलं की, ती एका अशा व्यक्तीच्या रिलेशनशिपमध्ये होती जो एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. ती म्हणाली की, त्याने त्याच्या या कंडिशनबाबत माझ्यासोबत खोटं बोलला. पण मी त्याला पूर्णपणे माफ केलं.
अनेकदा लोक अति उत्साहात अशा चुका करतात की, ज्यांचा नंतर पश्चाताप होतो. एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. महिलेला एका व्यक्तीसोबत रिलेशनशिप ठेवणं फारच महागात पडलं आहे. ही महिला या व्यक्तीला ऑनलाईन डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेटली होती. पण तिला जराही अंदाज नव्हता की, तो तिचं पूर्ण आयुष्य बदलून ठेवेल.
महिलेने सांगितलं की, ती एका अशा व्यक्तीच्या रिलेशनशिपमध्ये होती जो एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. ती म्हणाली की, त्याने त्याच्या या कंडिशनबाबत माझ्यासोबत खोटं बोलला. पण मी त्याला पूर्णपणे माफ केलं.
महिला म्हणाली की, २००३ मध्ये ती १९ वर्षांची होती आणि त्यावेळी तो ऑस्ट्रेलियाच्या पर्शमध्ये शिक्षण घेत होता. त्यावेळी तिची डेटिंग वेबसाइटवर एका हॅंडसम व्यक्तीसोबत भेट झाली. काही दिवस चॅटिंग केल्यानंतर आम्ही माझ्या घरी भेटण्याचा प्लान केला.
जेव्हा तो माझ्या घरी आला तेव्हा काही गोष्टी फारच पुढे गेल्या. हे सगळं काही अचानक होत होतं. मी रोमान्सनंतर त्या व्यक्तीला सरळ विचारलं की, तुला एचआयव्ही आहे का? तो नाही म्हणाला. मी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला.
२००३ मध्ये मला भयंकर फ्लू झाला ज्यानंतर मी टेस्ट केली. फेब्रवारीमध्ये मी माझ्या मैत्रिणीसोबत एचआयव्ही क्लीनिकमध्ये गेले. तिथे आम्ही दोघींनीही टेस्ट केली. एका आठवड्यानंतर आम्ही पुन्हा क्लीनिकमध्ये गेलो तर माझ्या मैत्रिणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण मला माहीत होतं की, मी अडचणीत आहे. मला डॉक्टरांनी सांगितलं की, मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. त्यावेळी माझं वय केवळ २० वर्षे होतं.
काही महिने गेल्यावर मी एक एचआयव्ही फ्रेंडली डेटिंग वेबसाइट सर्च केली आणि पर्थमधेच राहणाऱ्या एका तरूणासोबत चॅटिंग सुरू केलं. चॅटिंग दरम्यान आम्ही एकमेकांचे फोटो शेअर केले. त्या तरूणाने फोटो शेअर केल्यावर मी लगेच त्याला ओळखलं. तो तरूण तोच होता ज्याला मी एक वर्षाआधी भेटले होते. त्याला माझा चेहरा अजिबात लक्षात नव्हता. पण त्याला बघताच मला सगळं आठवलं.
त्यानंतरही मी त्याच्यासोबत बोलले आणि त्याच्या आवडी-निवडीबाबत विचारलं. सोबतच हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, तो कंडोमच्या वापराबाबत काय विचार करतो. त्यानंतर मी मोठा श्वास घेतला आणि त्याला विचारलं की, तू एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे का? त्यावर तो म्हणाला की, हो, १५ वर्षे झालीत.
यावरून मला जुन्या गोष्टी आठवल्या की, कशाप्रकारे या व्यक्तीने मला एचआयव्ही संक्रमित केलं. महिलेने सांगितलं की, जे काही झालं त्यातून मी हे शिकले की, गोष्टी बदलत असतात आणि कधीही त्या एकसारख्या नसतात. काही बदल तर असे असतात की, ज्यांच्याबाबत स्वप्नातही विचार केला जाऊ शकत नाही.
एचआयव्हीची माहिती मिळाल्यावर मी जास्त घाबरायला लागले होते. मी हा विचार करत होते की, ज्या लोकांना एचआयव्ही होतो त्यांना कधीच प्रेम मिळत नाही आणि त्यांचा तरूणपणीच मृत्यू होतो. एक वर्षानंतर मी पुन्हा त्या व्यक्तीला भेटले ज्याने मला एचआयव्ही पॉझिटिव्ह केलं. आता तो फार बदलला आहे. त्याच्या चेहऱ्यावर वेदना, लाज आणि भीती स्पष्टपणे दिसते. त्या व्यक्तीने माझ्यासोबत जे काही केलं त्यासाठी मी त्याच्याकडे एकदाही तक्रार केली नाही. मी त्याला माफ केलं.